कोल्हापूर देशाच्या नवीन संसदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नंदीचे चित्र असलेला राजदंड स्थापित केला जाणार आहे 75 वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही रविवारी होणाऱ्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी असाच राजदंड सोपवण्यात येणार आहे खास वैशिष्ट्य म्हणजे या राजदंडाशी साधर्म साधणारा राजदंड कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या चक्रेश्वरवाडीतल्या सुरसुंदरीच्या भग्न मूर्तीच्या हातात छातीजवळ धरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे मंदिरात आढळलेली ही मूर्ती बाराव्या शतकातील असल्याचे शिलालेख पुरावे आहेत 2003 मध्ये मिळाले होते पुरावे करवीर महात्म्याचा अभ्यास करताना 2003मध्ये अभ्यासकांना राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीतल्या मंदिरात सुरसुंदरीची भग्न अवस्थेत असलेली मूर्ती मिळाली होती ही मूर्ती सुमारे दीड ते दोन फुटांची असून हातामध्ये छातीजवळ राजदंड धरलेल्या अवस्थेत आहे चक्रेश्वरवाडीतील प्राचीन शिवमंदिर बाराव्या शतकातील असून ही मूर्ती सध्या भग्न अवस्थेत आढळून आली आहे राजदंडाला धारण करणारी स्त्री असल्याने सार्वभौम सत्तेचे पुरावे करवीर नगरीत पाहायला मिळतातती याचिका न्यायालयाने फेटाळली नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या देशभरात रणकंदन सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी महिला असल्याने राष्ट्रपती दौर्पदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यापासून डावलण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांनाच नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला दणका दिला आहेकाय आहे याचिकेचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात नवीन संसदेचे बांधकाम करण्यात आले आहे या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी करण्यात येणार आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीच्या उद्घाटनाला विरोध करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उद्घाटन करु नये यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहेआपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला राजदंड गांधी घराण्याने नेहरूजींची काठी म्हणून संग्रहालयाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवला होताः स्मृती इराणी भाजपकाय म्हणाल्या स्मृती ईरानी राजदंड भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे धर्म विश्वास आणि लोकशाहीचे प्रतीक मानला जाणारा राजदंड संग्रहालयाच्या अंधाऱ्या कोठडीत ठेवणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी कॉंग्रेसला विचारला आहे सेंगोल म्हणजे काय सेंगोल हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानले जाते तामिळनाडूतील चोल राजवटीत एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता हस्तांतरित करण्यासाठी वापरला जात होता त्याचप्रमाणे ब्रिटिशांकडून भारतात सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक आहे ते लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ठेवण्यात येणार आहेहेही वाचा New Parliament Building Inauguration नवीन संसद भवन उद्घाटन प्रकरणी याचिकाकर्त्याला दणका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिकाsaamana editorial पंतप्रधान मोदींच्या खासगी पंगतीत कोणी बसायचं नाही नवीन संसदेच्या उद्धाटनावरुन संजय राऊतांची पुन्हा टीका