ETV Bharat / state

Saptarangi Dnyaneshwari : सहा महिन्यात हाताने लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी; निवृत्त प्राध्यापकाची अनोखी माऊली भक्ती

author img

By

Published : Jun 23, 2023, 10:38 PM IST

मूळचा शिक्षकाचा पिंड पण दरवर्षी वारीची लागलेली आस, पंढरीच्या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होत कोल्हापुरातील राधानगरीतल्या राशिवडे बुद्रुक ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशी न चुकता वारी करणारे निवृत्त प्राध्यापक, अनिल कावणेकर यांनी सहा महिन्यात दोन हजार पाने सप्तरंगी ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढत अनोखी माऊली भक्ती जोपासली आहे.

Saptarangi Dnyaneshwari
सप्तरंगी ज्ञानेश्वरी

माहिती देताना प्राध्यापक अनिल कावणेकर

कोल्हापूर : दोन हजार पानांची ज्ञानेश्वरी तीही सुवाच्य आणि सप्तरंगी अक्षरात लिहून काढण्याचा संकल्प अनिल कावणेकर यांनी सहा महिन्यांपूर्वी केला होता. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीवर अपार श्रद्धा असलेल्या कावणेकर यांनी अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सप्तरंगात ज्ञानेश्वरी लिहून काढली. त्यांचे मोत्यासारखे अक्षर असल्यामुळे ज्ञानेश्वरीची छपाई केली असल्याचा भास पाहणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्तांना होतो.

हस्तकला कावणेकर यांनी जोपासली : रेखीव अक्षरांचे नैसर्गिक दान लाभलेल्या कावणेकर यांच्याकडे राशिवडे गावातील जुने-जाणते लोक काहीही लिहून घेण्यासाठी कावणेकर यांच्याकडे येतात. कावणेकर यांनी आतापर्यंत ज्ञानेश्वरीसह संत एकनाथांची कवने, रामायण भगवतगीता, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुस्तके स्वतःच्या सुरेख हस्ताक्षरात लिहिली आहेत. कावणेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील सुंदर हस्ताक्षरांच्या पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी, हस्तकला कावणेकर यांनी जोपासली आहे.



मुखपृष्ठावर साकारली ज्ञानोबा माऊली : कावणेकर यांनी स्व-हस्ताक्षरात लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर समाधीस्थ असलेले, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय मनोवेधक चित्र रवींद्र पोतदार यांनी साकारले आहे. राशिवडे गावासह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी खास हे चित्र पाहण्यासाठी अनिल कावणेकर यांच्या घरी येतात.



घरात ठेवण्यासाठी जागा नाही इतके ग्रंथ : वाचनप्रिय आणि कलेची साधना करणारा शिक्षक अशी कावणेकर यांची ओळख आहे. घरामध्ये त्यांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ आणि वाचनाची पुस्तके मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे घरातील कपाटे अच्छादाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील कपाटे ग्रंथ आणि पुस्तकांनी भरलेली आहेत. ग्रंथावर प्रेम करणाऱ्या या अवलीयाने आपल्या राहत्या घराचे ग्रंथालयात रूपांतर केले आहे.

हेही वाचा -

  1. Pasaidan of Shamima Akhtar: काश्मीरच्या शमीमा अख्तरने गायले पसायदान; विठ्ठलभक्तीत झाली तल्लीन
  2. Deer dance Viral Video हरिण झाले भजनात तल्लीन व्हायरल व्हिडिओमागे सत्य काय आहे
  3. Dnyaneshwar Mauli Palkhi : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.