ETV Bharat / state

'ईडीच्या कारवाईचे स्वागतच पण, मुख्यमंत्र्यांवरसुद्धा गुन्हा दाखल करा'

author img

By

Published : Sep 25, 2019, 7:43 PM IST

शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा व्हावा, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा व्हावा, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिरोळमध्ये बोलताना शेट्टींनी ईडीकडून झालेल्या कारवाईचे स्वागत करत राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी ज्यांनी कर्ज घेतले ते मोकाटच आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी सध्या भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे, या भाजपवासींवर ईडी कारवाई करणार का, असा सवालही राजू शेट्टींनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा - पवारांच्या अंगावर हात टाकून भाजपने 'वाघाला' डिवचले, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

शिवाय चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले. ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याची टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली.

Intro:अँकर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे. शिवाय शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी शेट्टींनी केली आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला आहे. Body:व्हीओ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याबाबत सर्वप्रथम याचिका दाखल करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिरोळमध्ये बोलताना शेट्टींनी ईडीकडून झालेल्या कारवाई स्वागत करत राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला, तरी ज्यांनी कर्जे घेतली ते मोकाटच आहेत, असे कर्ज घेतलेल्या अनेकांनी सध्या भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या भाजपावासींवर ईडी कारवाई करणार का असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याची टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली. शिवाय चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

बाईट: राजू शेट्टी, माजी खासदारConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.