ETV Bharat / state

Objections On Ward Structure : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर हरकती; नागरिकांची ईडीकडे तक्रार नोंदविण्याची तयारी

author img

By

Published : Jun 10, 2022, 8:19 PM IST

Zilla Parishad
जिल्हा परिषद

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या (Zilla Parishad Panchayat Samiti) प्रभाग रचनेवर हरकती (Objections to ward structure) घेतल्या जात आहेत. या प्रभाग रचना ज्या अधिका-यांनी केल्या. त्यांच्या विरोधात थेट ईडीकडे तक्रार नोंदविण्याची तयारी जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थांनी (Citizen Preparing to lodge a complaint with ED) केली आहे.

कोल्हापूर: हातकणंगले तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती (Zilla Parishad Panchayat Samiti) मतदारसंघ बचाव कृती समितीने प्रभाग रचना करत असताना आर्थीक देवाण घेवाण झाल्याची तक्रार करत थेट या संदर्भात ईडीकडे तक्रार करण्याची प्रक्रिया (Citizen Preparing to lodge a complaint with ED) सुरु केली आहे. याबाबतच आज शेट्टी यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत स्वाभिमानी सुद्धा आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेमध्ये आर्थिक लालसेपोटी झालेली हेराफेरी व गंभीर चुका सुधारा याबाबतचे लेखी निवेदन आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांना देण्यात आले.

चुका सुधारण्यासाठी सूचना द्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेट्टी यांनी म्हंटले आहे की, हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांची रचना करत असताना तालुक्यातील काही राजकीय लोकांनी संबंधित विभागाचे तहसीलदार प्रांत या सर्वांना आपल्या कोल्हापूर येथील कार्यालय मध्ये बोलावून घेऊन आपल्याला हवा तसा नकाशा तयार करून त्यास जिल्हाधिकारी यांचेकडून मान्यता घेतल्या बाबतच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या.

त्या अनुषंगाने तालुक्यातील हेरले जिल्हा परिषद मतदारसंघ, रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ, रुई जिल्हा परिषद मतदारसंघ, कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ, भादोले जिल्हा परिषद मतदारसंघ ,या मतदारसंघाची रचना करत असताना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशातील अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसते. यामध्ये हेरले जिल्हापरिषद मतदारसंघांमध्ये हलोंडी, हेरले, माले, मालेवाडी, आळते, बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, मजले या गावांचा समावेश केला आहे.

हलोंडी, हेरले, माले नंतर जवळपास बारा ते पंधरा किलोमीटरचा डोंगर व सामाजिक वनीकरणाची क्षेत्र असताना डोंगराच्या पलीकडे गावी कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली यामध्ये दळणवळणाचे रस्ते व भौगोलिक सलगनता राखली गेली नाही. असेही त्यांनी म्हंटले आहे. शिवाय यापुढे जाऊन स्वाभिमानी रस्त्यावर उतरले असेही म्हंटले.

हेही वाचा : Widow Remarriage : 'विधवा प्रथा बंदी'नंतर अजून एक पाऊल पुढे; विधवांनी पुनर्विवाह केल्यास 11 हजारांचे अनुदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.