ETV Bharat / state

Deepak Kesarkar: कंत्राटी निवृत्त शिक्षक भरण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू- आ. जयंत आसगावकर यांचा इशारा

author img

By

Published : Jul 13, 2023, 3:46 PM IST

Updated : Jul 13, 2023, 4:06 PM IST

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर निवृत्त शिक्षक घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात डीएड, बीएडधारक बेरोजगार असताना निवृत्त शिक्षकांना संधी का दिली जात आहे? शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी निर्णय मागे न घेतल्यास डीएड, बीएड धारकांसह सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा, पुणे पदवीधर विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी दिला आहे.

Deepak Kesarkar
शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जयंत आसगांवकर

माहिती देताना आ. जयंत आसगावकर

कोल्हापूर : भावी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरात लाखो डीएड, बीएड अभियोग्यताधारक आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना 2010 यावर्षी अभियोग्याता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. त्या परीक्षेची भरती अद्याप सुरू असून आता पुन्हा 2023 मध्ये अभियोग्यता चाचणी शिक्षण विभागाने घेतली आहे. लाखो अभियोग्यता धारकांनी ही परीक्षा देऊन आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळात शिक्षकांची रिक्त पदे असताना भरती रखडली आहे.

राज्यभर करणार आंदोलन : आता या रिक्त जागेवर निवृत्त शिक्षक घेण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने 7 जुलैला घेतला. यामुळे राज्यातील लाखो डीएड, बीएडधारकांनी या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाविरोधात डीएड बीएडधारक संघटना एकवटल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पावसाळी अधिवेशनात सभागृहात आवाज उठवणार आहे. तसेच राज्यभर आंदोलन करणार असल्याचे, पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितले.



विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी : कोरोनाच्या संकटानंतर आता बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. राज्यभरातील डीएड, बीएडधारक अभियोग्यता परीक्षा दिलेले उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने निवृत्त शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार डीएड बीएडधारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. डीएड बीएडचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी पोटाला चिमटा काढून मुलाला शिकवले. मात्र, आता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोगच होत नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray: 'तेव्हा' सेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ता होते - मंत्री दीपक केसरकर
  2. Sangli Food Poisoning Case : विद्यार्थी विषबाधा प्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिले चौकशीचे आदेश
  3. Deepak Kesarkar on Sindhudurg Visit : उद्धव ठाकरेंमुळेच सगळे तुटले, धनुष्यबाण आमचाच - शिक्षणमंत्री दिपक केसरकर
Last Updated : Jul 13, 2023, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.