ETV Bharat / state

मंत्री अमित देशमुख, सतेज पाटलांची भर पावसात सभा; 'त्या' ऐतिहासिक सभेची आठवण

author img

By

Published : Apr 6, 2022, 6:58 AM IST

भर पावसात सभा
भर पावसात सभा

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ येथील टाकाळा चौकात सभा सुरू होती. यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र सातारा येथे झालेल्या शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेची आठवण झाली.

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वैद्यकिय मंत्री अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी भर पावसात सभा घेतली. विशेष म्हणजे उपस्थित नागरिकांनी सुद्धा यावेळी पावसात थांबून मंत्र्यांचे भाषण ऐकले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ येथील टाकाळा चौकात सभा सुरू होती. यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावली. मात्र सातारा येथे झालेल्या शरद पवारांच्या 'त्या' ऐतिहासिक सभेची आठवण झाली.

मंत्री अमित देशमुख, सतेज पाटलांची भर पावसात सभा

सतेज पाटील यांना वाढदिवसाची भेट द्या - यावेळी बोलताना मंत्री देशमुख म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे न्यायचा असेल तर जयश्री जाधव यांना आपल्या सर्व जनतेची साथ गरजेची आहे. कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जसा विश्वास आधी दाखवला आहे तोच विश्वास दाखवत यापुढेही महाविकास आघाडीच्या पाठीशी रहा. शिवाय येत्या 12 एप्रिल रोजी मतदान आहे. त्याच दिवशी पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे जयश्री जाधव यांना विजयी करून सतेज पाटील यांना वाढदिवसाची भेट द्या असेही ते म्हणाले.

तर कोल्हापूर उत्तर विधानसभेतील पहिल्या आमदार होतील - जयश्री जाधव यांचा विजय म्हणजे सर्वसामन्यांचा विजय आहे. जिवाचं रान करा, भाजपच्या भूल थाप्पाना बळी पडू नका. कोल्हापुरात चांगल्या प्रकारे वैद्यकिय शिक्षण देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. शिवाय पुरातत्व आरखड्यासाठी व चित्रनगरीसाठी निधी कमी पडू दिला नाही. सतेज पाटील यांचे सारखे पालकमंत्री असल्याने कोल्हापूर शहरवासीय नशीबवान आहेत. कोल्हापूरची संस्कृती येथील एतहासिक परंपरा वेगळी आहे. तुमचे मत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी असेल असे म्हणत जयश्री जाधव कोल्हापूर उत्तर विधानसभेतील पहिल्या आमदार होतील असा विश्वास सुद्धा मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.