ऊसदर आंदोलनावर बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ; राजू शेट्टींचं आंदोलन सुरूच राहणार

ऊसदर आंदोलनावर बोलावण्यात आलेली बैठक निष्फळ; राजू शेट्टींचं आंदोलन सुरूच राहणार
Raju Shetty agitation Continue: ऊसदर आंदोलनासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज (गुरुवारी) बोलवण्यात आलेल्या बैठकीत कोणताच मार्ग न निघाल्यानं (Sugarcane Rate Issue) कारखाने बंद राहणार आहेत. (Raju Shetty Meeting) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेली मागणी कारखानादारांवर अन्याय करणारी आहे, असं जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hasan Mushrif) म्हणाले.
कोल्हापूर Raju Shetty agitation Continue : जिल्ह्यातील कोणत्याच साखर कारखान्याला स्वाभिमानीच्या मागणीनुसार दर देणं परवडणारं नाही. जिल्ह्या लगतच्या कर्नाटकात साखर कारखाने सुरू झाले असून आता यावर विचार करण्याची गरज आहे, अशी माहिती (Kolhapur Collectorate meeting) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यंदाची ऊसाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागण्यांसाठी जिल्हाभर आंदोलनं सुरू आहेत. गळीत हंगाम लांबत असल्यानं यावर तोडगा निघणं गरजेचं असल्यानं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचे प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.
स्वाभिमानीची मागणी अन्यायकारक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली मागणी ही साखर कारखानदारांवर अन्याय करणारी आहे. शेजारील कर्नाटकात साखर कारखान्यांनी दोन लाखांचे मॅट्रिक टनाचे गाळप केले. आता जिल्ह्यातील ऊस कर्नाटकात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून आंदोलनात तोडगा निघण्याची अपेक्षा होती; मात्र ही बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी अंतिम तोडगा म्हणून त्यांना शंभर रुपये शेतकऱ्यांना जादा देण्याची तयारी दर्शवली. परंतु, स्वाभिमानीच्या नेत्यांसह शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना हा तोडगाही मान्य झाला नाही. त्यामुळे त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. रविवारी जिल्हाभर होणारं चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. यामुळे आता ऊस तर आंदोलनामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे.
बैठकीत झाला गोंधळ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. राजू शेट्टींनी जिल्ह्यात पदयात्रा काढून जयसिंगपूर येथे झालेल्या 22 व्या ऊस परिषदेत यंदाची पहिली उचल साडेतीन हजार आणि मागच्या वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा अशी मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. दिवाळीपूर्वी आंदोलनात कोणताच तोडगा निघाला नाही. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बैठक झाली. यात संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. प्रतिनिधींच्या नावाखाली बगलबच्चे बैठकीत बसवण्याच्या आरोप करून राजू शेट्टी आक्रमक झाले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी शेट्टी यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा:
