ETV Bharat / state

कोल्हापुरातील हार्डवेअर दुकानाला मोठी आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

author img

By

Published : Nov 14, 2019, 1:08 AM IST

आमले मार्केट येथील लक्ष्मी हार्डवेअर या दुकानाल आग लागली असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

लक्ष्मी हार्डवेअरला आग

कोल्हापूर - शहरातील बागल चौकात एका दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आमले मार्केट येथील इमारतीत लक्ष्मी हार्डवेअर या दुकानाला ही आग लागली असून धुराचे मोठे लोट पसरले आहेत. दरम्यान, अग्निशमनच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापुरातील हार्डवेअर दुकानाला लागलेली आग

हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याचे आदेश, ६ दिवसांपासून होते हॉटेल रिट्रीटमध्ये

बुधवारी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान बागल चौकातील एका दुकानाला आग लागली. लक्ष्मी हार्डवेअर असे या दुकानाचे नाव आहे. दरम्यान, आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. या दुकानामध्ये गाडींच्या कोचिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने संपूर्ण दुकानात पसरली. दरम्यान, अग्निशमनच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे.

हेही वाचा - 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची तयारी : कराबाबत वित्त मंत्रालयाने मागविल्या सूचना

Intro:अँकर : कोल्हापुरातील बागल चौकातील एका दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. येथील आमले मार्केट या बिल्डिंगमधील लक्ष्मी हार्डवेअर या दुकानाला आग लागली असून धुराचे मोठे लोट पसरले आहेत. अग्निशमनच्या तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साडे दहाच्या दरम्यान ही आग लागली असून आग नेमकी कशामुळे लागली हे समजले नाहीये. या दुकानामध्ये गाडींच्या कोचिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने संपूर्ण दुकानात पसरली. सद्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.