ETV Bharat / state

Kolhapur Press Club : 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूर प्रेस क्लबच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित

author img

By

Published : Jan 8, 2023, 4:22 PM IST

Shekhar Patil honored with Best Journalist Award
शेखर पाटील

दरवर्षी कोल्हापूर प्रेस क्लब (Kolhapur Press Club) या पत्रकारांच्या संस्थेकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा तसेच छायाचित्रकारांचा गौरव करण्यात येतो. ईटीव्ही भारतचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शेखर पाटील यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित (Shekhar Patil honored with Best Journalist Award) करण्यात आले.

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील पुरस्कार स्विकारताना

कोल्हापूर : ईटीव्ही भारतचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शेखर पाटील यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या (Kolhapur Press Club) उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित (Shekhar Patil honored with Best Journalist Award) करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथील सभागृहात हा दिमाखदार कार्यक्रम पार पडला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि स्तंभलेखक सुधींद्र कुळकर्णी, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरवर्षी 4 पुरस्कार : दरवर्षी कोल्हापूर प्रेस क्लब या पत्रकारांच्या संस्थेकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा तसेच छायाचित्रकारांचा गौरव करण्यात येतो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला नव्हता. मात्र यावर्षी एका दिमाखदार कार्यक्रमात 2020 आणि 2021 सालचे पुरस्कार देण्यात आले. दरवर्षी दैनिक मध्ये पत्रकार आणि फोटोग्राफर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार तसेच व्हिडिओग्राफर यांना पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.

आजवर अनेक हटके स्टोरी : दरम्यान, ईटीव्ही भारतच्या माध्यमातून शेखर पाटील यांनी विविध हटके आणि सर्वांचे लक्ष वेधून घेईल अशा स्टोरी कव्हर केल्या आहेत. यामध्ये 2020 2021 मध्ये उल्लेख करायचा झाल्यास 1) माडीच्या घरांचे गाव (ज्या बातमीमुळे कौलव गावाला एक वेगळी ओळख मिळाली) 2) एकाच घरातील सहा मुली बनल्या पोलीस (ज्या बातमीची उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा घेतली होती दखल) 3) लॉकडाऊन नंतर घरी परतलेल्या इंजिनिअर तरुणाने जनावरांच्या गोठ्यात सुरू केला कारखाना 4) कधीकाळी टांग्याशीवाय पर्याय नसायचा त्या कोल्हापूरात आज टांगेवाल्यांची काय आहे अवस्था 5)ज्या गावाची 40 वर्षे सफाई कर्मचारी म्हणून सेवा केली त्याच गावाने शेवटी सन्मानाने आजीबाईंना ग्रामपंचायत सदस्य बनवले. यासह विविध स्टोरींचा उल्लेख करता येईल. आशा एकापेक्षा एक स्टोरीमुळे शुक्रवारी 6 जानेवारी 2023 रोजी पत्रकार दिनानिमित्त "कोल्हापूर प्रेस क्लबच्या" मानाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने शेखर पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

'या' पत्रकारांनाही केले सन्मानित : यावेळी सदानंद पाटील यांना लक्षवेधी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच प्रिंट मीडियाच्या दयानंद लिपारे, समीर देशपांडे, एकनाथ नाईक, फोटोग्राफर आदित्य वेल्हाळ, नासिर अत्तार तसेच दुर्वा यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.