ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : बातमी प्रसिद्ध होताच कोरोना बुलेटिन वेळेत सुरू

author img

By

Published : Jul 31, 2020, 11:31 AM IST

Etv bahrat impact on  Corona update bulletin
Etv bahrat impact on Corona update bulletin

दररोजच कोरोनाची अधिकृत अपडेट मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना ताटकळत बसावे लागत होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दररोज सकाळी 10 आणि रात्री 10 वाजता बुलेटिन प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी मिळालेल्या अपडेट प्रमाणेच यापुढे सुद्धा वेळेत मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच सीपीआर प्रशासनाकडून कोरोना संदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर करायला दररोज रात्रीचे 12 वाजायचे. याबाबत ई टीव्ही भारतने 'राज्यात सर्वात उशिरा कोरोना बुलेटिन प्रसिद्ध करणारा जिल्हा कोल्हापूर' या आशयाची बातमी प्रसिद्ध केली. यामध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात किती वाजता अधिकृत माहिती दिली जाते? याबाबतची सविस्तर माहिती दिली होती. या बातमीने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने दखल घेत गुरुवारी चक्क साडे दहा वाजताच कोरोनाची अपडेट प्रसिद्ध केली.


दररोजच कोरोनाची अधिकृत अपडेट मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना ताटकळत बसावे लागत होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दररोज सकाळी 10 आणि रात्री 10 वाजता बुलेटिन प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी मिळालेल्या अपडेट प्रमाणेच यापुढे सुद्धा वेळेत मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गुरुवारी सकाळी 10 पासून जिल्ह्यात तब्बल 296 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर बुधवारी रात्री 10 ते गुरुवारी रात्री 10 या 24 तासांत 514 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 6095 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून 189 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार 168 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2509 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3418 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण आकडेवारी एक नजर -

गुरुवारअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा- 127

भुदरगड- 136

चंदगड- 377

गडहिंग्लज- 244

गगनबावडा- 13

हातकणंगले- 505

कागल- 106

करवीर- 661

पन्हाळा- 258

राधानगरी- 207

शाहूवाडी- 268

शिरोळ- 236

नगरपरिषद क्षेत्र- 1314

कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 1565

असे एकूण 6018 रुग्ण आढळले आहेत.

इतर जिल्हा व राज्यातील 77 असे मिळून एकूण 6095 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 6095 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2509 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 168 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे सद्यस्थितीत एक्टिव्ह रुग्णांची संख्या 3418 इतकी आहे.

वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षांपेक्षा लहान - 18 रुग्ण

1 ते 10 वर्ष - 348 रुग्ण

11 ते 20 वर्ष - 609 रुग्ण

21 ते 50 वर्ष - 3525 रुग्ण

51 ते 70 वर्ष - 1349 रुग्ण

71 वर्षांपेक्षा जास्त - 247 रुग्ण

एकूण 168 मृत रुग्ण पुढीलप्रमाणे -

इचलकरंजी - 54 रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर शहर - 30 रुग्णांचा मृत्यू

हातकणंगले - 18 रुग्णांचा मृत्यू

गडहिंग्लज - 6 रुग्णांचा मृत्यू

करवीर - 18 रुग्णांचा मृत्यू

आजरा - 3 रुग्णांचा मृत्यू

शिरोळ - 6 जणांचा मृत्यू

जयसिंगपूर - 3 रुग्णांचा मृत्यू

शाहूवाडी - 2 रुग्णांचा मृत्यू

पन्हाळा - 4 रुग्णांचा मृत्यू

चंदगड - 4 रुग्णांचा मृत्यू

भुदरगड - 2 रुग्णांचा मृत्यू

हुपरी - 5 रुग्णांचा मृत्यू

कुरुंदवाड - एका रुग्णाचा मृत्यू

कागल - 2 रुग्णांचा मृत्यू

इतर जिल्हा आणि राज्यातील 8 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.