ETV Bharat / state

Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांनी ताबडतोब राजीनामा द्यावा; मराठा समाजाची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 6:50 PM IST

Maratha Protest
कोल्हापूरात साखळी उपोषण

Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण सहाव्या दिवशी सुरु आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी राज्यभरातही मराठा आंदोनल पेटलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली नाही, तसेच कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे मंत्री पाटील यांनी उपसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वसंतराव मुळीक यांनी केली.

कोल्हापुरात मशाल पेटवून साखळी उपोषण सुरू

कोल्हापूर Maratha Reservation : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी एकदाही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली नाही. त्यांना चर्चा करायला जमत नसेल तर मंत्री पाटील यांनी उपसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. तर वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे मंत्री गिरीश महाजन कोण? (Minister Girish Mahajan) तसेच मराठा नेत्यांना चर्चेसाठी पाठवून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का? असा सवाल कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्र्यांना सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे.

गिरीश महाजन कोण? : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात मशाल पेटवून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची आज बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकदाही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही. मंत्री पाटील यांना चर्चा करायला जमत नसेल तर त्यांनी उपसमिती अध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली.



जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम बंद : दसरा चौकात सुरू असलेल्या उपोषणाला पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भेट दिली. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व जाहीर कार्यक्रम बंद करणार असल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil), यांनी जयश्री जाधव यांच्यासह उपोषण ठिकाणी येऊन काँग्रेसचे आमदारही यापुढे कोणताही जाहीर कार्यक्रम करणार नसल्याचं सांगितलं.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी शिर्डी राहणार बंद; साईबाबा मंदिर खुलं
  2. Maratha Reservation : ठाण्यात सुनील तटकरेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
  3. Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.