Chandgad MD Drugs Case : एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड; ढोलगरवाडीत ड्रग्ससह एकजण ताब्यात

author img

By

Published : Nov 16, 2021, 4:25 PM IST

Updated : Nov 16, 2021, 4:33 PM IST

chandgad drugs case

चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत गुन्हे अन्वेषण शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मुंबई पोलिसांनी ड्रग्ससह एकाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे एमडी ड्रग्जचे चंदगड कनेक्शन उघड झाले आहे. (Chandgad connection of MD drugs revealed)

कोल्हापूर - एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड झाले आहे. (Chandgad connection of MD drugs revealed) ड्रग्स प्रकरणी कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी गावातील एकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जवळपास 4 किलो ड्रग्स जप्त केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी ड्रग्ससह एकाला ताब्यात घेतले आहे.

गेल्या 3 दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू असून 6 जणांची कसून चौकशी करण्यात आली. या ड्रग्जची कोट्यवधी रुपये किंमत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या 10 जणांच्या विशेष पथकाकडून चौकशी केली जात आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे.

एमडी ड्रग्सचे चंदगड कनेक्शन उघड

चंदगडमध्ये ड्रग्ज जप्त करून पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत. एमडी अमली पदार्थाचे कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यात धागेदोरे आहेत. मुंबई पोलिसांकडून कोढोलगरवाडी गावातून 72 तासांच्या चौकशीनंतर एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा समावेश असून कोट्यवधीचा माल मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत ढोलगरवाडीतल्या एका फार्महाऊसवर सलग तीन दिवस तपास केला गेला. या प्रकरणी एका मोठ्या वकिलाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फार्महाऊसवर एमडी ड्रग्स बनवण्याचा व्यवसाय सुरू होता.मुंबईत एका महिला ड्रग्स पेडलरला अटक केल्यानंतर कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला.
Last Updated :Nov 16, 2021, 4:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.