कोल्हापूर - जे स्वत:च्या घरावर हल्ला झाल्यावर रोखू शकले नाहीत, मग भीमा कोरेगावचे काय बोलत आहे. याबाबतीत आम्हीही भरपूर बोलू शकतो. जाती जातीमध्ये तेढ आणि संघर्ष निर्माण करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) उद्योग झाला असल्याची टीका चंद्रकांत पाटील ( BJP leader Chandrakant Patil ) यांनी केली आहे. आज ( गुरुवारी ) शरद पवार यांनी भीमा कोरेगावच्या ( Bhima Koregaon hearing ) सुनावणीनंतर भाजपा ही दंगल थांबवू शकली असती. मात्र त्यांनी केले नाही, म्हणाले होते. पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे.
दोन जातींना एकमेकांशी भिडवायचे आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा, हेच त्यांनी आयुष्भर केले. त्यांच्याकडून अजून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी भारतीय जनता पार्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र भारतीय जनता पार्टी याच्या डावात कधीही सापडली नाही. या उलट भाजपा ही दिवसेंदिवस वाढत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. आत्ता मराठा समाज आणि ओबीसी समाजाला ही कळाले आहे, पवार साहेब म्हणजे काय आहेत. मीच समाजाचा तारणहार आहे, असा आव आणायचा आणि आपण मोठ व्हायचे आणि बाकीच्यांना आपल्या गाडी मागे फिरवायचे अशी निती शरद पवारांची पहिल्या पासून राहिली आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.