ETV Bharat / state

OBC Reservation : ओबीसी प्रश्नावर मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा अन् जाब विचारा -पडळकर

author img

By

Published : Jan 16, 2022, 12:25 PM IST

सरकार गंभीर नसून ओबीसी आरक्षणाबाबत फक्त चालढकल करण्याचे काम करत आहे असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (OBC Reservation) मोठमोठे नेते ओबीसींच्या नावावर (OBC Political Reservation) मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात असे म्हणत ओबीसीचे मंत्री जिथे भेटतील तिथे त्यांना गाठून जाब विचारा अस आवाहनही पडळकर यांनी यावेळी केले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर

मुंबई - ओबीसी प्रश्नावर सरकार गंभीर नसून फक्त चालढकल करण्याचे (OBC Reservation) काम करत आहे असा आरोप भाजप (OBC Political Reservation)आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मोठमोठे नेते ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात असे म्हणत ओबीसीचे मंत्री जिथे भेटतील (BJP MLA Gopichand Padalkar) तिथे त्यांना गाठून जाब (Backward Classes Commission)विचारा अस आवाहनही पडळकर यांनी यावेळी केले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

आयोगासाठी फक्त साडेचार कोटी

ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पुर्णवेळ सचिव. आणि आयोगाचे संशोधक सोलापूरात आणि आयोग पुण्यात. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी "फुकट घावले आणि गाव सारे धावले" अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे, असा आरोपही पडळकर यांनी लगावला आहे.

आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार?

उद्याच्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. आणि त्यासाठी उद्धव सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले, तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार असे जाहीर केले. याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणूकात ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही. आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. म्हणून मी समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा अस आवाहनही पडळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - Drug Spraying by Drone : ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, पहा ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.