ETV Bharat / state

कर्जबाजारीपणाला कंटाळून जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Nov 17, 2019, 11:58 AM IST

Updated : Nov 17, 2019, 12:41 PM IST

भोकरदन

कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. समाधान शेनफड साबळे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

जालना - कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. समाधान शेनफड साबळे (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१६) उघडकीस आली.

समाधानने स्टेट बँक ऑफ हैदराबादचे ४ लाख रुपयांचे कर्ज आणि इतर काही संस्थांकडून कर्ज घेतले होते. या वर्षी निसर्गाने कशीबशी साथ दिली होती. मात्र, ऐनवेळी परतीच्या पावसाने मोठे नुकसान केल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार, या चिंतेत साबळे होते. समाधान शुक्रवारी सकाळपासून घरातून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. मात्र, अनेक ठिकाणी चौकशी करून तो सापडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास समाधानचा मृतदेह गारखेडा शिवारातील जालना रस्त्यालगत असलेल्या बाजीराव साबळे यांच्या गट क्रमांक 179 मधील विहिरीमध्ये सापडला. ही बातमी गावात समजताच एकच खळबळ उडाली.

young farmer suicide in bhokardan
समाधान शेनफड साबळे

हेही वाचा - कामगार आणि कंपनी व्यवस्थापनात वाद; औद्योगिक वसाहतीमध्ये तणावाचे वातावरण

या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तत्काळ पंचनामे करण्यासाठी सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पंचनामा करून मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत शेतकरी समाधान साबळे यांना 11 वर्षांचा मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी आई एक भाऊ दोन बहिणी आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

Intro:कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा.
भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील घटना
भोकरदन:दिनांक 16 नोवेंबर 2019 शनिवार
भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील समाधान शेनफड साबळे या तरुण शेतकऱ्याने डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजापाई कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळून आपले जीवन यात्रा संपूर्ण टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की शेतकरी समाधान साबळे 36 या तरुण शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद कडून चार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्याची विश्वसनीय माहिती असून इतरत्र देखील या शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा असल्याचे ऐकण्यात येत आहे. शिवाय याहीवर्षी निसर्गाने कशीबशी शेतकऱ्यांना साथ दिली होती मात्र ऐनवेळी परतीच्या पावसाने मोठा फटका दिल्यामुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार अशी चिंता देखील साबळे यांना खात होती. व ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात देखील असल्याचे ऐकावयास येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समाधान साबळे हे काल शुक्रवारी रोजी सकाळ पासून घरातून निघून गेले होते व ते रात्र झाल्यानंतर देखील घरी पोहोचले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले मात्र ते काही दिसून आले नाही मात्र आज सकाळी अकरा वाजे दरम्यान शेतकरी समाधान साबळे यांचा मृतदेह गारखेडा शिवारातील जालना रस्त्यालगत असलेल्या बाजीराव साबळे यांच्या गट क्रमांक 179 मधील विहिरीमध्ये सापडला. हे बातमी गावात समजताच एकच खळबळ उडाली. दरम्यान शेतकरी साबळे यांनी शुक्रवारी रोजी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असावी अशीच चर्चा होताना दिसून येत आहे.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याला कळविले त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी सहकाऱ्यांना घटनास्थळावर पाठविले सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. मृत शेतकरी समाधान साबळे यांना 11 वर्षाचा मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी आई एक भाऊ दोन बहिणी आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.Body:कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा.
भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील घटना
भोकरदन:दिनांक 16 नोवेंबर 2019 शनिवार
भोकरदन तालुक्यातील गारखेडा येथील समाधान शेनफड साबळे या तरुण शेतकऱ्याने डोक्यावर असलेल्या कर्जाच्या बोजापाई कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळून आपले जीवन यात्रा संपूर्ण टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की शेतकरी समाधान साबळे 36 या तरुण शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ हैदराबाद कडून चार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्याची विश्वसनीय माहिती असून इतरत्र देखील या शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा असल्याचे ऐकण्यात येत आहे. शिवाय याहीवर्षी निसर्गाने कशीबशी शेतकऱ्यांना साथ दिली होती मात्र ऐनवेळी परतीच्या पावसाने मोठा फटका दिल्यामुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कसा उतरणार अशी चिंता देखील साबळे यांना खात होती. व ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात देखील असल्याचे ऐकावयास येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समाधान साबळे हे काल शुक्रवारी रोजी सकाळ पासून घरातून निघून गेले होते व ते रात्र झाल्यानंतर देखील घरी पोहोचले नसल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले मात्र ते काही दिसून आले नाही मात्र आज सकाळी अकरा वाजे दरम्यान शेतकरी समाधान साबळे यांचा मृतदेह गारखेडा शिवारातील जालना रस्त्यालगत असलेल्या बाजीराव साबळे यांच्या गट क्रमांक 179 मधील विहिरीमध्ये सापडला. हे बातमी गावात समजताच एकच खळबळ उडाली. दरम्यान शेतकरी साबळे यांनी शुक्रवारी रोजी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असावी अशीच चर्चा होताना दिसून येत आहे.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिस ठाण्याला कळविले त्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तात्काळ पंचनामे करण्यासाठी सहकाऱ्यांना घटनास्थळावर पाठविले सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. मृत शेतकरी समाधान साबळे यांना 11 वर्षाचा मुलगा असून त्यांच्या पश्चात पत्नी आई एक भाऊ दोन बहिणी आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.Conclusion:
Last Updated :Nov 17, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.