ETV Bharat / state

पीकविमा भरण्यासंदर्भात 'सीएससी' चालकांना प्रशिक्षण

author img

By

Published : Jun 25, 2019, 11:26 AM IST

मागील वर्षी पिक विम्याचा अर्ज भरताना झालेल्या काही चुकांमुळे अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळाले नाही. यामुळे यंदा अशा चुका टाळल्या जाव्यात यासाठी सीएससी चालकांना जालन्यात प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षणावेळचे छायाचित्र

जालना - प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019- 20 मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरताना अडचण येऊ नये तसेच कंपनी आणि शेतकऱ्यांमधील पुढील वाद टाळले जावेत, यासाठी पिक विमा कंपनीच्या वतीने सीएससी चालकांना आज पिक विमा अर्ज भरून घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

माहिती देताना गणेश कान्हेरे


मागील वर्षाच्या पीक विम्याचे पैसे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि पीक विमा कंपनी यांच्यामधील वाद वाढतच जात आहे. ही चूक पुन्हा या वर्षी होऊ नये. म्हणून खरीप हंगामाचा पिक विमा भरून घेणारी बजाज अलियांस या कंपनीच्या वतीने आज ज्या केंद्रांवर पिक विमा भरला जाणार आहे, अशा सुमारे एक हजार सीएससी केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले.

शेतकर्‍यांनी घ्यावयाची काळजी
- शेतकऱ्यांनी एकाच जमिनीच्या क्षेत्रफळावर दोन ठिकाणी पिक विमा भरू नये, भरल्यास दोन्ही ठिकाणचे अर्ज बाद होऊ शकतात.

- जमिनीत जे पीक आहे त्याच पिकाचा विमा भरावा अन्यथा तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही .
- पिक पेरा यावर तलाठीच्या सहीची आवश्यकता नाही, स्वतःची सही करावी.

- मुदतीच्या शेवटी पिक विमा न भरता ऑनलाइन प्रस्ताव लवकर भरावा.

- पीक विमा भरताना संबंधित सीएससी चालकाने प्रशिक्षण घेतले आहे किंवा नाही याची खात्री करावी, तसेच पिक विम्याच्या रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम केंद्र चालकांना देऊ नये.

- जे केंद्रचालक जास्तीची रक्कम मागतील त्याची तक्रार सीएससी हेल्प डेस्कच्या ७० ६६६ १५ ४४४ या क्रमांकावर कळवावी. तसेच पुराव्यासह व्हॉट्सअप करावे.

अशी असेल पीक विम्याची रक्कम (रक्कम प्रति हेक्टर मध्ये) कंसामध्ये शेतकरी विमा रक्कम
बाजरी 20000 (400),सोयाबीन 43 हजार (860), मुग 19000 (380) ,तुर 31500 (630) ,कापूस 43 हजार(2150) मका 27500 (550)

Intro:प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2019- 20 मध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरताना अडचण येऊ नये, आणि कंपनी आणि शेतकऱ्यांमधील पुढील वाद टाळले जावेत म्हणून पिक विमा कंपनीच्या वतीने सीएससी चालकांना आज हे अर्ज भरून घेण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.


Body:मागील वर्षीच्या पीक विम्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी आणि आणि पीक विमा कंपनी यांच्यामधील वाद वाढतच जात आहेत ,ही चूक परत या वर्षी होऊ नये म्हणून खरीप हंगामाचा पिक विमा भरून घेणारी बजाज अलियांस या कंपनीच्या वतीने आज ज्या केंद्रांवर पिक विमा भरला जाणार आहे अशा सुमारे एक हजार सीएससी केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले.
* अशी असेल पीक विम्याची रक्कम*( रक्कम प्रति हेक्टर मध्ये) कंसामध्ये शेतकरी विमा रक्कम
बाजरी 20000 (400 ),सोयाबीन 43 हजार (860), मुग 19000 (380) ,तुर 31500 (630) ,कापूस 43 हजार(2150) मका 27500 (550)
* शेतकर्‍यांनी घ्यावयाची काळजी *
शेतकऱ्यांनी एकाच जमिनीच्या क्षेत्रफळावर दोन ठिकाणी पिक विमा भरू नये, भरल्यास दोन्ही ठिकाणचे अर्ज बाद होऊ शकतात.
जमिनीत जे पीक आहे त्याच पिकाचा विमा भरावा अन्यथा तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही .
पिक पेरा यावर तलाठ्याच्या सहीची ची आवश्यकता नाही स्वतःची सही करावी.
मुदतीच्या शेवटी पिक विमा न भरता ऑनलाइन प्रस्तावलवकर भरावा.
पीक विमा भरताना संबंधित सीएससी चालक याने प्रशिक्षण घेतले आहे किंवा नाही ही याची खात्री करावी, तसेच पिक विम्याच्या रक्कमेपेक्षा जास्तीची रक्कम केंद्र चालकांना देऊ नये. जे केंद्रचालक जास्तीची रक्कम मागतील त्याची तक्रार सीएससी हेल्प डेस्कच्या 70 666 15 444 या नंबर वर कळवावी .तसेच पुराव्यासह व्हाट्सअप करावे.
सोमवारी हे प्रशिक्षण देण्यासाठी बजाज अल्लीअंज कम्पणीचे रितेश सिंग,किरण सपकाळे,यांच्यासह विशाल तायडे,नितीन गायके, शिवहरी जयभाये, आदींची उपस्थित होती.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.