ETV Bharat / state

MLA Santosh Danve's Assassination : जालना गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तारांचा नंबर पहिला आसला पाहिजे : आमदार संतोष दानवे

author img

By

Published : Jun 11, 2022, 5:53 PM IST

Updated : Jun 11, 2022, 6:40 PM IST

BJP workers with Raosaheb Danve
रावसाहेब दानवेंसोबत भाजप कार्यकर्ते

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता चिखलफेकीला सुरुवात झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यावर संतोष दानवे यांनी प्रतिक्रिया म्हणाले की, उलट अब्दुल सत्तार यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली. विधान परिषद निवडणुकीतही ते आम्हाला मदत करतील. भाजप आमदार संतोष दानवे यांचा गौप्यस्फोट. संजय राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार यांचा एक नंबरला असायला पाहिजे, असे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत केली. विधान परिषद निवडणुकीतही ते आम्हाला मदत करतील. भाजप आमदार संतोष दानवे यांचा गौप्यस्फोट संजय राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार यांचा एक नंबरला असायला पाहिजे असे आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

आमदार संतोष दानवे

सत्तार यांची विरोधी पक्षाला मदत : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप मदत झाली, असा गौप्यस्फोट भाजपचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी यांनी केला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीत सत्तार यांनी भाजपला जशी मदत केली, अशीच मदत ते विधान परिषद निवडणुकीत भाजपला पुन्हा करतील, अशी अपेक्षादेखील संतोष दानवे यांनी सत्तार यांच्याकडून व्यक्त केली आहे.


संतोष दानवे म्हणाले, सत्तार हेच खरे गद्दार : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करणाऱ्या गद्दारांची यादी आमच्याकडे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना अपक्ष आमदार गद्दार नसून, राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरवर असायला हवेत, असा कणखर टोलाही आमदार संतोष दानवे यांनी सत्तार यांना लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी आमदार संतोष दानवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याचे सत्तार यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना संतोष दानवे यांनी सत्तार यांच्यावर हा बॉंब टाकला.



हेही वाचा : Rajya Sabha Election 2022 आमच्यात कोणतेही मतभेद नाही - अब्दुल सत्तार

Last Updated :Jun 11, 2022, 6:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.