ETV Bharat / state

शाळांनी स्वयंशिस्त पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी - आरोग्य मंत्री राजेश टोपे

author img

By

Published : Oct 4, 2021, 8:07 PM IST

राज्यात आजपासून शाळा सुरू झाल्या. दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज शाळेत धडे घेतले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विद्यार्थी शाळेत जात असल्याचे समाधान मानले.

Rajesh Tope appeals for self discipline
जालना शाळा सुरू राजेश टोपे प्रतिक्रिया

जालना - राज्यात आजपासून शाळा सुरू झाल्या. दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आज शाळेत धडे घेतले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी विद्यार्थी शाळेत जात असल्याचे समाधान मानले. त्याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज व्यक्त करत शाळा व्यवस्थापनाने स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

आवाहन करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

हेही वाचा - जालना जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहीकांचे वाटप, टोपेंचा रुग्णवाहीका चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

सर्व परवानग्या घेऊनच राज्यातील शाळा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शाळा सॅनिटाईझ करूनच विद्यार्थ्यांना शाळेत बसवले जात आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांचे दोन्हीही डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थी हा समाजातील नाजूक घटक आहे, त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने स्वयंशिस्त पाळावी. शाळा नियमांचे पालन करतात की नाही, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही टोपे यांनी म्हटले.

एखाद्या शाळेत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी कली पाहिजे. या पथकाजवळ स्वतःचे डॉक्टर्स असतात. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबाबत काही शंका असल्यास पुढच्या उपाययोजना कराव्यात, अशा स्वतंत्र सूचना या पथकाला आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकार शाळांकडे लक्ष ठेवणारच आहे, मात्र शाळांनी देखील स्वनियंत्रण ठेवावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले.

हेही वाचा - "राजा शेतकरी रडला"... पावसाने शेतकरी बेहाल, पोलिसाचं ह्रदय पिळवटणारं गाणं व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.