ETV Bharat / state

Rajesh Tope Reaction ON Rane Tweet : शरद पवार यांच्यावरील केलेले ट्विट ही महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

author img

By

Published : Jun 25, 2022, 12:23 PM IST

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांच्याशी राज्यातील आरोग्याचा आढावाबाबत बातचीत करताना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकीय घडामोडींबाबतसुद्धा ( About Political Developments ) वक्तव्य केलेले आहे. एकंदरीत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ ( Political Crisess in Maharastra ) झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले असताना, आम्ही माननीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच ( Under Guidance of Sharad Pawar )काम करणार आहोत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राणेंच्या ट्विटबद्दल ते म्हणाले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही शरद पवार यांच्याबरोबर उत्तम पद्धतीने काम करीत आहोत. महाविकास आघाडीसोबत आहोत.

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांच्याशी राज्यातील आरोग्य आढावाबाबत बातचीत करताना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकीय घडामोडींबाबतसुद्धा वक्तव्य केलेले आहे. एकंदरीत राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ ( Political Crisess in Maharastra ) झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले असताना, आम्ही माननीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहोत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. आम्ही त्यांच्याबरोबर उत्तम पद्धतीने काम करीत आहोत. महाविकास आघाडीसोबत उभे राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

आम्ही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली : राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीबाबतदेखील टोपे यांनी भाष्य करीत काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवार साहेबांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शरद पवार यांच्या सूचनेनुसार वाटचाल केली जाईल, असेही ते म्हणाले.

राणेंचे ट्विट राज्याची संस्कृती नाही : नारायण राणे यांनी शरद पवार यांच्याबाबत जे ट्विट केले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना, राजेश टोपे म्हणाले की, राणे यांनी केलेले ट्विट हे राज्याची संस्कृतीला शोभणारे नाही. अशा प्रकारचे वक्तव्य कोणीही करू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती अजिबात नाही. महाराष्ट्र खूप प्रगत राष्ट्र-राज्य आहे. त्यामुळे हे वक्तव्य महाराष्ट्रात शोभत नाही.


आरोग्याचा आढावा : कोरोनानंत आता मंकीपाॅक्सचे संकटावर बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मंकीपाँक्सचा राज्यातच काय देशात एकही रुग्ण नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील कोरोना रुग्नसंख्या आटोक्यात आणण्यासाठी WHO च्या सुचनेनुसार काम केलं जात असल्याचेदेखील टोपे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी काढले शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 38 आमदारांची ट्विट केली यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.