ETV Bharat / state

Devagiri Express Accident : जालनाजवळ देवगिरी एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला; रेल्वे मार्गावर ड्रम ठेवत घातपाताचा कट

author img

By

Published : Jul 6, 2023, 12:13 PM IST

Updated : Jul 6, 2023, 12:20 PM IST

Etv Bharat
देवगिरी रेल्वे

जालना जिल्हा हद्दीत मोठा रेल्वे अपघात (Devagiri Express Accident) टळला आहे. रेल्वे रुळावर लोखंडी ड्रम ठेवला होता. हा ड्रम रेल्वे चालकाला दुरवरुन निदर्शनास आला. त्यावेळी त्याने लगेच रेल्वेचा वेग कमी करत (Devagiri Express News) इमर्जन्सी ब्रेक दाबला व रेल्वे थांबवली. रेल्वे चालकाच्या (Jalna Railway News) सावधानतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. बुधवारी (5 जुलै) रात्री उशिरा हा प्रकार घडला आहे.

जालना - नांदेड रेल्वेमार्गावर असलेल्या सातोना-उस्मानपूर रेल्वे (Devagiri Express Accident) स्थानकादरम्यान अज्ञाताने लोखंडी (Devagiri Express News) ड्रम रेल्वे रुळावर ठेवला होता. देवगिरी एक्सप्रेस येत असताना रेल्वे चालकाला दुरवरून समोर रुळावर काहीतरी वस्तू असल्याचे निदर्शनास (Jalna Railway News) आले. रेल्वेमार्ग चॕनल क्रमांक 234 ते 235 मध्ये रेल्वे चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावून रेल्वे थांबवली.

मोठा रेल्वे अपघात टळला - रेल्वे रुळावर लोखंडी ड्रममध्ये पत्रे भरलेले होते. अज्ञात व्यक्तीने ते रूळावर ठेवले होते. परंतू, दूरवरून रेल्वे चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी रेल्वेचा वेग कमी करत इमर्जन्सी ब्रेकच्या मदतीने रेल्वे थांबवली. परंतू, अगदी कमी वेगात रेल्वे या ड्रमला धडकली. रेल्वे धडकल्याने ड्रम हवेत ऊडून बाजूला पडले. रेल्वे चालकाने खाली ऊतरून पाहणी केली असता ड्रमच्या बाजूला एक लोखंडी पोल रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेला असल्याचे दिसून आला.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - याविषयी चौकशी केली असता, या मार्गावर रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी फाऊंडेशन बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्यासाठी लागणारे साहित्य रेल्वे रूळाच्या आसपास पडलेले असल्याचे दिसून आले. अशातच अज्ञाताने लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर ठेवला होता. त्याचवेळी देवगिरी एक्सप्रेस येत असल्याने मोठा अपघात होता होता थांबला. यासंबंधी सहाय्यक उपनिरीक्षक परतूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास हाती घेतला आहे. संबंधित ड्रम जप्त करण्यात आलेला आहे.

काळजी घेण्याची मागणी - रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे होणारा मोठा अपघात टळला आहे. भविष्यात अशा प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, अशी प्रवाशांमध्ये चर्चा होत आहे.

ओडिशा रेल्वे अपघात - जून महिन्यात ओडिशा राज्यातील बालासोर येथे कोरोमंडलसह इतर दोन रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात जवळपास 280 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास एक हजार प्रवासी या अपघातात जखमी झाले होते.

हेही वाचा -

  1. Railway News: रेल्वे रूळ तुटला; तरुणाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला
  2. Railway Accident : बिगर इंजिनाची पळाली रेल्वे.. रुळावरून घसरले डब्बे.. मोठा अपघात टळला..
Last Updated :Jul 6, 2023, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.