Jalna Rammurthy theft Case जांबसमर्थ येथील राममूर्ती चोरीचा तपास सीबीआयकडे द्या; आमदार कैलास गोरंट्याल

author img

By

Published : Sep 13, 2022, 8:16 PM IST

कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचे ठिय्या आंदोलन

जांबसमर्थ येथील राममूर्ती चोरीचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्या (Jambasmarth Rammurthy theft investigation to CBI), अशी मागणी कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल ( Congress MLA Kailas Gorantyal) यांनी केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

जालना: जांबसमर्थ येथील राममूर्ती चोरीचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्या (Jambasmarth Rammurthy theft investigation to CBI), अशी मागणी कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल ( Congress MLA Kailas Gorantyal) यांनी केली आहे. या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

चोरीला गेलेल्या मूर्तींंचा शोध घेण्यात पोलीस अपयशी - जालन्यातील जांब समर्थ येथील राममूर्ती चोरीला 22 दिवस उलटले आहे; मात्र या प्रकरणी अजून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या नसून आरोपीही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे मूर्ती चोरीचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्यावा, या मागणीसाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रामाच्या नावावर निवडून आलेल्यांनी मूर्ती चोरी प्रकरणी राजकारण करू नये, असा सल्लाही कैलास गोरंट्याल यांनी विरोधकांना दिलाय. पोलिसांना मूर्ती शोधण्यात येत्या 15 दिवसांत यश आलं नाही. तर जिल्हाभरात आंदोलन केलं जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोेलन - रामदास स्वामींनी पूजलेल्या राम-लक्ष्मण-सीतेच्या प्राचीन मूर्ती चोरी गेल्या प्रकरणी जांब समर्थ गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला 20 दिवस उलटल्यानंतरही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. सुमारे 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती अशा एकाएकी चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये मोठी अस्वस्थता असून जांब समर्थ येथील गावकऱ्यांमध्येही नाराजी आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून मंदिरातील मूर्ती आणून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. पण पोलीस यंत्रणा यात अपयशी ठरली. मूर्ती मिळाल्या नाही तर, अन्नत्याग करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.