ETV Bharat / state

जालन्यात कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Dec 2, 2019, 11:56 AM IST

dead bhausaheb salve
मृत भाऊसाहेब साळवे

भाऊसाहेब साळवे याच्याकडे ३ एकर जमीन आहे. त्यात साळवेवर पीक कर्ज आणि साखर कारखान्याची काही उचल असे मिळून सुमारे एक लाखाच्या जवळपास कर्ज आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे त्याच्या शेतातील मक्याचे पूर्णपणे नुकसान झाले. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होता.

जालना - भोकरदन तालुक्यातील एका कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाला कंटाळून शेतकऱ्याने गळाफास घेत आत्महत्या केल्याची घडना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. भाऊसाहेब दौलत साळवे (वय 32, रा. कुंभारी ता. भोकरदन) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

भाऊसाहेब साळवे याच्याकडे ३ एकर जमीन आहे. त्यात साळवेवर पीक कर्ज आणि साखर कारखान्याची काही उचल असे मिळून सुमारे एक लाखाच्या जवळपास कर्ज आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे त्याच्या शेतातील मक्याचे पूर्णपणे नुकसान झाले. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होता. कर्ज फेडण्याचे विचारातच नैराश्य आल्याने त्याने रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कुंभारी गावातील राहत्या घराच्या मागील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार,खून प्रकरण; पीडितेचे नाव बदलून केले 'जस्टिस फॉर दिशा'

त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. त्याच्यावर कुंभारी येथे रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर तेजराव साळवे यांनी दिलेल्या माहितीवरून भोकरदन पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर अधिक तपास बीट अंमलदार संदीप उगले हे करीत आहे.

हेही वाचा - एमएमटीसीने तुर्कीकडून 11 हजार टन कांदा आयातीचा निर्णय

Intro:भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या..
भोकरदन
भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील तरुण शेतकरी भाऊसाहेब दौलतराव साळवे वय 31 वर्षे याने कर्जबाजारीपणाला व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीला कंटाळुन राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रविवार दिनांक  एक डिसेंबर रोजी  दुपारी  दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली.
भाऊसाहेब साळवे ह्याच्याकडे कुंभारी शिवारात तीन एकर जमीन आहे त्याच्यावरती पिक कर्ज व साखर कारखान्याची काही उचल असे मिळून सुमारे एक लाखाच्या जवळपास कर्ज आहे अवेळी आलेल्या पावसामुळे त्याच्या शेतातील मकाचे पूर्णपणे नुकसान झाले त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून कर्ज कसे फेडावे या विवंचनेत होता या कर्ज फेडण्याचे विचारातच नैराश्य आल्याने त्याने रविवारी एक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या कुंभारी गावातील राहत्या घराच्या मागील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे त्याच्या वर कुंभारी येथे रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले सुधाकर तेजराव साळवे यांनी दिलेल्या माहितीवरून भोकरदन पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास बीट अंमलदार संदीप उगले हे करीत आहे.
Body:भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.