ETV Bharat / state

गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीवरून मित्रानेच केला मित्राचा खून

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 10:57 PM IST

Jalna Murder Case
खून

Jalna Murder Case: गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या शाब्दिक बाचाबाची वरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना (Friend murder) जालना जिल्ह्यातील पीर पिंगळगाव तालुक्यात आज (शनिवारी) घटली. दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय 23 वर्ष) असे मृताचे नाव आहे. घटनेतील आरोपी आणि त्याचे 3-4 साथीदार अद्यापही फरार आहेत. (dispute over gutkha)

पीर पिंपळगाव (जालना) Jalna Murder Case: जालना जिल्हा सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. आज सायंकाळी जालना शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात मित्रां-मित्रामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रूपांतर चक्क मारामारीत झाले. (Pir Pimpalgaon Shivar) यामध्ये दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय 23 वर्ष) या तरुणावर आरोपी अरविंद लक्ष्मण शेळके (वय वर्ष 40, राहणार पीर पिपळगाव ता. जिल्हा जालना) याने गुटखा पुडी मागण्यावरून शाब्दिक बाचावाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे याचा अरविंद लक्ष्मण शेळके याने खून केला.

डॉक्टरांनी केले मृत घोषित: अरविंद लक्ष्मण शेळके आणि त्याचे तीन ते चार साथीदार फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चारही मित्र दारू प्यायलेले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. जखमी युवक दिलीप कोल्हे यास ग्रामस्थांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता दाखल केले. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल अशी माहिती चंदनझीरा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

जालन्यात गुन्हेगारी उच्चांकावर: या झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जालन्यात सध्या लूटमारीच्या घटना तसेच खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात विशेष करून जालना शहरात गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता शहरात संचारण्यातसुद्धा भीती वाटत असल्याचे व्यापारी वर्ग तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

  1. ईडी प्रकरणावरुन रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा; काका म्हणाले, 'पुतण्या अजून बच्चा'वाटलं होतं
  2. आंधळी झाले, पण राम मंदिरामुळं डोळ्याचं पारणं फिटलं; 96 वर्षीय शालिनीताईंचा अनुभव
  3. 'सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींपेक्षा शिंदे समितीच्या सदस्यांना अधिक वेतन'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.