ETV Bharat / state

अतिवृष्टीने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांपुढे दिवाळीसह दसरा साजरा करण्याचा प्रश्न

author img

By

Published : Oct 13, 2020, 4:29 PM IST

huge loss of kharip crop due to heavy rains farmers question how to celebrate diwali and dussehra
अतिवृष्टीने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान

ऐन दसरा-दिवाळीच्या दिवसांत शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या एकूण हंगामापैकी एकंदरीत ९० टक्के खरीप हंगामाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. याशिवाय परतीचा पाऊस लांबत असल्याने रब्बीच्या पेरण्यासुद्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्याचा परिणाम बाजार पेठेवर सुद्धा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कापलेले सोयाबीन मातीमोल ठरले आहे. सोयाबीनच्या सुड्या उभ्या आहेत. त्यातील काही काळ्या पडल्या. तर कित्येक ठिकाणी उभ्या बाजरीच्या कणासाला कोंब आले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

बदनापूर (जालना)- सततच्या दुष्काळी परिस्थितीनंतर या वर्षी जून महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे बदनापूर तालुक्यातील खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हक्काने उत्पादन मिळवून देणारे मूग, उडीद पावसामुळे पूर्णपणे उदध्वस्त झालेले असतानाच आता मका, बाजरी व सोयाबिन सोंगणी करून ठेवलेले असताना आलेल्या परतीच्या पावसाने तेही हातातून जाणार असल्याचे चित्र आहे. नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूस पिकालाही प्रचंड फटका बसला असून कापूस बोंडातून निघून आल्यानंतर ओला होऊन गळून पडत आहे. कित्येक ठिकाणी कापूस बोंडे सडून लालसर झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दसरा दिवाळी कशी साजरी करावी ही चिंता आहे.

अतिवृष्टीने खरीप पिकाचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांपुढे दिवाळीसह दसरा साजरा करण्याचा प्रश्न

तालुक्यात यंदा सुरुवातीपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यातच गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने पंचनामे केल्यानंतरही शेतकरी मात्र, मदतीच्या प्रतिक्षेत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच गावात परतीचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह झाला. २ते ३ दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास निसगार्ने हिरावला यात बाजरी, सोयाबीन, मका ,कापूस आदी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके आडवी पडून जमीनदोस्त झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन, बाजरी सोंगून ठेवलेली हेाती. ती जमा करून झाकून ठेवल्यानंतरही जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या या पिकांना जागेवरच मोडे येत असल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसून व जमीन खरडून खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले. यात तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांना प्रामुख्याने मोठा तडाखा बसला

ऐन दसरा-दिवाळीच्या दिवसांत शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या एकूण हंगामापैकी एकंदरीत ९० टक्के खरीप हंगामाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. याशिवाय परतीचा पाऊस लांबत असल्याने रब्बीच्या पेरण्यासुद्धा लांबणीवर पडल्या आहेत. त्याचा परिणाम बाजार पेठेवर सुद्धा जाणवत आहे. अनेक ठिकाणी कापलेले सोयाबीन मातीमोल ठरले आहे. सोयाबीनच्या सुड्या उभ्या आहेत. त्यातील काही काळ्या पडल्या. तर कित्येक ठिकाणी उभ्या बाजरीच्या कणासाला कोंब आले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. दसऱ्यापूर्वी मका, सोयाबिन व बाजरीची विक्री करून रब्बी पिकांची पेरणी खर्च व दिवाळी दसरा साजरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो पण यंदा खरीप हंगामातील पिकांमधून उत्पादन निघण्याची शक्यता नसून नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे कापूस पिकांवरही या पाऊसामुळे परिणाम झालेले आहे. उभ्या पिकावरील कापूस ओला होत आहे, तर अतिपावसामुळे काही शेतीतील बोंडच सडले असल्यामुळे उत्पादन शून्य होणार आहे. तर काही ठिकाणी कापूस लालसर होत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सण कसे साजरे करावे ही विवंचना आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.