ETV Bharat / state

कोरोनामुळे बदलल्या आंदोलनाच्या पद्धती; प्रहार संघटनेचे राज्यभर "घर बैठे" आंदोलन

author img

By

Published : Jun 5, 2020, 9:32 PM IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असल्यास चित्रकला, कार्यानुभव, क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षक यांची नियुक्ती गरजेची आहे. याकडे लक्ष्य वेधण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशिय संघटनेने राज्यभर 'घर बेठै' आंदोलन पुकारले.

Ghar baithe andolan by prahar jalna
प्रहार संघटनेचे राज्यभर "घर बैठ" आंदोलन

जालना - राज्यात अतिथी निदेशक म्हणजे चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक तसेच संगणक शिक्षक यांच्या प्रलंबित नियुक्तीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर 'घरबैठे' आंदोलन करण्यात आले. प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज (शुक्रवारी) सकाळी ९ ते १० या वेळेत हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात राज्यातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन घरच्या घरीच करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मंत्री बच्चू कडू यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असल्यास चित्रकला, कार्यानुभव, क्रिडा शिक्षक व संगणक शिक्षक यांची नियुक्ती गरजेची आहे. याकडे लक्ष्य वेधण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशिय संघटनेने राज्यभर 'घर बेठै' आंदोलन पुकारले.

महाराष्ट्र राज्यातील अंशकालीन निदेशक, चित्रकला, कार्यानुभव व क्रीडाशिक्षक यांना गेल्या वर्षापासून नियुक्त्या दिल्या नाहीत. एकीकडे नियुक्त्या नाहीत तर दुसरीकडे टाळेबंदीमुळे काम नाही, अशा अवस्थेत हे शिक्षक सापडलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व कौशल्यात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असून चित्रकला, कार्यानुभव व शारिरीक शिक्षण या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी या निदेशकांची नियुक्ती गरजेची आहे. शिवाय शिक्षणात संगणकाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.

लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संगणक व ई-लर्निंग आदी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी तज्ञ असलेल्या संगणक शिक्षकांनाही अद्याप नियुक्ती दिलेल्या नाहीत. तसेच इयत्ता नववी व दहावीकरिता संगणक शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांनाही मागील वर्षापासून नियुक्ती देण्यात आली नाही. संगणक शिक्षक नसल्याने नववी व दहावीसाठी आयसीटी विषय केवळ नावाला शिकवला जातो.

विद्यार्थ्यांना संगणक अध्यापनाकरिता शाळेला मिळालेल्या ३३ लाखाच्या संगणक लॅब शिक्षक नसल्यामुळे धूळखात पडून आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या शिक्षकांनाही नियुक्त देणे गरजेचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.