ETV Bharat / state

Little Girl Murder : धक्कादायक! जालन्यात साडेपाच वर्षीय चिमुकलीची ब्लेडने वार करून हत्या

author img

By

Published : Nov 28, 2022, 3:15 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगरात साडेपाच वर्षांच्या ईश्वरी रमेश भोसले या बालिकेचा ब्लेडने खून ( Little Girl Murder in jalna ) करण्यात आला आहे. उपचारा दरम्यान या चिमुकलाचा मृत्यू झाला आहे.

जालना : शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगरात साडेपाच वर्षाच्या बालिकेचा ब्लेडने वार करून खून ( Little Girl Murder in jalna ) करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात ईश्वरी रमेश भोसले (वय साडेपाच वर्षे) ही काकाकडे शिकण्यासाठी आली होती. 11 जून 2022 रोजी तिच्या घराजवळच असलेल्या स्वरूप इंग्लिश स्कूलमध्ये तिचा प्रवेशही झाला होता.

चिकमुली रक्ताच्या थारोळ्यात - ईश्‍वरीचे आई वडील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथे शेती करतात. ईश्‍वरीला आई वडीलांनी काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चौधरी नगर भागातील तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या गणेश यांच्या बाथरूममध्ये रक्ताने माखलेली ईश्वरी दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर ब्लेडच्या खोलवर जखमा झालेल्या होत्या. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती . अशा अवस्थेत तिला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

लहान व्यक्तीने कृत्य केल्याचा अंदाज - दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग तालुका पोलीस ठाण्याचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. प्राथमिक अंदाजावरून हा खून लहान व्यक्तीने केल्याचा संशय बळावला आहे. ज्या व्यक्तीने हा खून केला आहे त्या लहान व्यक्तीचे घरामध्ये येऊन कपडेही बदललेले आहेत. तसेच बाथरूम मध्ये पाणी टाकून रक्ताने माखलेले बाथरुमही स्वच्छ केल्याचे दिसून आले. घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाची ठसे घरात जागोजागी दिसत आहेत. ईश्वरीचे काका गणेश हे प्रयोगशाळा चालवतात त्यामुळे दिवसभर त्यांच्या घरी त्यांची पत्नी आणि त्यांची इतर दोन मुले हेच राहत होते. लहान व्यक्तीने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.