ETV Bharat / state

Ajit Pawar MSRTC Strike : सरकारच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका -अजित पवारांचा इशारा

author img

By

Published : Dec 17, 2021, 3:22 PM IST

Updated : Dec 17, 2021, 4:58 PM IST

सरकार एक पाऊल पुढे आलंय; (Ajit Pawar on MSRTC Strike) आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा निर्वाणीचा इशारा (Ajit Pawar warns ST workers) जळगाव दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Ajit Pawar on MSRTC Strike
Ajit Pawar on MSRTC Strike

जळगाव - सरकार एक पाऊल पुढे आलंय, (Ajit Pawar on MSRTC Strike) आता टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा निर्वाणीचा इशारा (Ajit Pawar warns ST workers) जळगाव दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee strike) वेतनवाढ दिली आहे, आमचे परिवहन मंत्री अनिल परब सातत्याने प्रयत्न करत आहेत, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावे.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार
ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात ओबीसी समुदाय हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला डावलून चालणार नाही. केंद्राने इम्पिरिकल डेटा दिला नाही म्हणून अडचण आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आरक्षणासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू राहतील.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला यश मिळाले असं म्हणता येणार नाही, कारण ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार यापूर्वीही निवडून येत होते, तेच यावेळीही निवडून आलेत, फक्त महाविकास आघाडीची मते एका ठिकाणी फुटली, ती का फुटली याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. उपाययोजना सुरू आहेत, तिसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी.
Last Updated : Dec 17, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.