ETV Bharat / state

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात जळगाव भाजपा महिला आघाडीकडून निदर्शने

author img

By

Published : Nov 27, 2020, 12:38 PM IST

Updated : Nov 27, 2020, 12:49 PM IST

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्य शासनाच्या विरोधात जळगावमध्ये भाजपा महिला आघाडीने निदर्शने केली. ठाकूर आज जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीसाठी जळगावात आलेल्या आहेत.

Demonstration
निदर्शन

जळगाव - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीला यशोमती ठाकूर जिल्हा परिषदेत आढावा बैठकीसाठी आल्या. ठाकूर यांच्या आगमनावेळी भाजपe महिला आघाडीच्या काही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, भेट नाकारल्याने भाजपeच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

यशोमती ठाकूर यांच्या विरोधात जळगाव भाजपा महिला आघाडीकडून निदर्शने करण्यात आली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरूणी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विषयासंदर्भात मंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदन देण्यासाठी भाजपाच्या महापौर भारती सोनवणे, महानगरपालिका स्थायी समितीच्या माजी सभापती अ‌ॅड. शुचिता हाडा, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह काही कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या आवारात आल्या होत्या. परंतु, मंत्री यशोमती ठाकूर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना न भेटताच आढावा बैठकीसाठी निघून गेल्या. त्यानंतर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेश द्वारावरच रोखून धरले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तेथेच निदर्शने करण्यास सुरुवात केली.

आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते -

राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आम्ही मंत्री यशोमती ठाकूर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी याठिकाणी आलेलो होतो. मात्र, यशोमती ठाकूर आमचे म्हणणे ऐकून न घेताच, निवेदन न स्वीकारताच आढावा बैठकीसाठी निघून गेल्या. त्या स्वतः महिला आहेत. त्यांनी महिलांवरील अत्याचारासंदर्भात आमचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते. त्यांनी अक्षरशः पळ काढला. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, याची प्रचिती आम्हाला पुन्हा एकदा आल्याची भावना भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पोलिसांसोबत तू तू-मैं मैं -

पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली. परंतु, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगी दिली नाही.

हेही वाचा - वाढीव वीज बिलांविरोधात मनसे आक्रमक; जळगावात मोर्चा काढून नोंदवला सरकारचा निषेध

Last Updated :Nov 27, 2020, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.