ETV Bharat / state

जळगावात पावसाची दमदार बॅटिंग

author img

By

Published : Jul 27, 2019, 8:15 PM IST

जळगावात पावसाची दमदार बॅटींग

जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेमुळे शहरातील गल्ल्यांमध्ये तसेच उपनगरांमध्ये रस्ते खोदण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे पाईप टाकल्यानंतर रस्त्यांच्या खड्ड्याची कामे झालेली नाहीत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होेत आहे.

जळगाव - सतत हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने अखेर जळगाव शहरात शनिवारी जोरदार हजेरी लावली. जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

जळगावात पावसाची दमदार बॅटींग

गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरात ढगाळ वातावरण होते. परंतु, पाऊस पडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास १ तास दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.

जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अमृत योजनेमुळे शहरातील गल्ल्यांमध्ये तसेच उपनगरांमध्ये रस्ते खोदण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे पाईप टाकल्यानंतर रस्त्यांच्या खड्ड्याची कामे झालेली नाहीत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होेत आहे.

Intro:जळगाव
येणार येणार म्हणत हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने अखेर जळगाव शहरात शनिवारी जोरदार हजेरी लावली. जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शहरात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने श्रावण मासाची अनुभूती येत होती. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.Body:गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरात पावसाचे वातावरण तयार होत होते. आकाशात ढग जमून येत होते. परंतु, पाऊस पडत नव्हता. मात्र, शनिवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास तासभर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांसह नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.Conclusion:दरम्यान, जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अधिकच दुर्दशा झाली. अमृत योजनेमुळे शहरातील कॉलन्या तसेच उपनगरांमध्ये रस्ते खोदण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या जलवाहिनीचे पाईप टाकल्यानंतर रस्त्यांच्या पॅच वर्कची कामे झालेली नाहीत. आता पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.