ETV Bharat / state

जळगावातील मेहरूण परिसरात दोन गटात हाणामारी; दोन जखमी, चार जणांना अटक

author img

By

Published : Oct 23, 2020, 10:20 PM IST

किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण करून गुप्ती आणि लोखंडी पट्टीने वार करण्यात आल्याची घटना मेहरूण परिसरातील दर्गाजवळ घडली. यात दोन जखमी झाले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

crime
अटक केलेले आरोपी

जळगाव - किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण करून गुप्ती आणि लोखंडी पट्टीने वार करण्यात आल्याची घटना मेहरूण परिसरातील दर्गाजवळ घडली. यात दोन जखमी झाले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जुबेर यासीम खाटीक (वय-३६ रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी) हे रिक्षाचालक आहेत. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते मित्र अशरफ शहा हे दोघे जहारतसाठी दर्गावर गेले होते. त्यावेळी जावेद शेख हा त्याच्या कुटुंबीयासह दुचाकीने जहारतसाठी आले होते. जावेदने दुचाकीची रेस वाढवून जोरजोरात आवाज केला. यावर जुबेरने आवाज न करण्याचे सांगितल्यानंतर रागाने बाहेर जावून जावेद शेखने मित्र शोयब शेख सलीम, अमर महबुब तडवी, समिन शेख जावेद शेख यांना घेवून आला. यातील शोएबने गुप्ती काढून जुबेरवर सपासप वार केले. तर इतरांनी दगड उचलून फेकून मारले. यात जुबेर जखमी झाला. हा प्रकार घडल्यानंतर जुबेरसोबत असलेले अशरफ शहा यांनी सोडवासोडव केली. त्यानंतर संशयित आरोपी जावेद व त्यांचे मित्र घटनास्थळाहून पसार झाले.

जुबेर खाटीक यांच्या तक्रारीवरून जावेद शेख, शोयब शेख सलीम, अमर महबुब तडवी, समिन शेख जावेद शेख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसऱ्या तक्रारीत म्हटले आहे की, मोहम्मद शोएब शेख सलीम (वय-२०, रा. बिलाल चौक तांबापूरा) हे २३ ऑक्टोबर रोजी मित्र अमल तडवी, मेहबुब तडवी, शब्बीर खान जावेद खान असे मेहरूणमधील दर्गावर जहारतसाठी गेले होते. त्याठिकाणी जुबेर खाटीक हा शोएबच्या आत्याशी भांडण करत होता. दोघांचे भांडण सोडवण्यासाठी शोएब मित्रांसह गेल्याचे याचा राग जुबेरला आला. जुबेरने हातातील लोखंडी पट्टी शोएबच्या हातावर मारून जखमी केले. तसेच जुबेरसह अहमद शाहा डबुशाह, जुबेरचा भाऊ, शाब्बीर खाटीक, गुलाब खाटीक अशांनी मारहाण केली. शोएबच्या तक्रारीवरून जुबेरसह इतर तीन जणांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परस्परविरोधात गुन्हा

घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटातील संशयित आरोपी जावेद शेख भिकन (वय-२६), मोहम्मद शोयब तडवी शेख सलीम (वय-२०), अमर मेहबुब तडवी (वय-१९) आणि समिर शेख जावेद शेख (वय-१९) सर्व रा. तांबापूरा या चौघांना अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.