ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच; आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के पावसाची नोंद

author img

By

Published : Aug 10, 2019, 10:32 AM IST

संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे

जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 39.1 टक्के म्हणजेच 257.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. यावर्षी मात्र, 9 ऑगस्टपर्यंत 418.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे.

जळगाव- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस सुरूच होता. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची साठी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम आहे. परंतु, आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिके कुजण्याची भीती आहे.

जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 39.1 टक्के म्हणजेच 257.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. यावर्षी मात्र, 9 ऑगस्टपर्यंत 418.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता शुक्रवारपर्यंत सर्वाधिक 73.6 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 48.4 टक्के पाऊस हा चाळीसगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 48.1 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

सुभाष महाजन, शेतकरी, रावेर

जिल्ह्यात आतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी)

जळगाव–426.9 मि.मी. (62.1 टक्के), जामनेर- 531.1 मि.मी. (73.6), एरंडोल- 412.5 मि.मी. (66.2), धरणगाव 395.4 मि.मी. (63.5), भुसावळ–467.2 मि.मी. (69.8), यावल 496.6 मि.मी. (71.2), रावेर– 440.2 मि.मी. (65.9), मुक्ताईनगर 476.1 मि.मी. (76.0), बोदवड– 425.9 मि.मी. (63.6), पाचोरा– 430.1 मि.मी. (57.9), चाळीसगाव 319.8 मि.मी. (48.4), भडगाव 346.6 मि.मी. (51.7), अमळनेर 348.2 मि.मी. (59.8), पारोळा 355.6 मि.मी. (57.7), चोपडा 405.2 मि.मी. (58.6) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्ण उघडले-

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने शुक्रवारी दुपारी हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्णपणे उघडण्यात आले होते. धरणातून २ लाख ४२ हजार ५०७ क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे तापी काठावरील गावातील नागरिकांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणसाठ्यात वाढ-

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील लक्षणीय वाढ होत आहे. हतनूर धरणात ३२.३९ टक्के तर गिरणा धरणात ५८.५९ टक्के पाणीसाठा आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात देखील ३४.४९ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे केटीवेअर, नाले तुडुंब भरले आहेत.

पावसाची रिपरिप सुरुच, सूर्यदर्शन नाहीच-

जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे संपू्र्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेवर पावसाचा परिणाम झाला आहे. जळगाव शहरात आज पहाटेपासूनच पाऊस सुरुच होता. कधी हलक्या तर कधी दमदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर भीज पाऊस सुरू होता. गेल्या चार दिवसात जळगावात सूर्यदर्शन झालेले नाही.

मुडी गावातील 100 कुटुंबांचे स्थलांतर-

धुळे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने पांझरा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर ओसरत नसल्याने पांझरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अक्कलपाडा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पांझरा नदीच्या पाण्याने अमळनेर तालुक्यातील मुडी गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला एका बाजूने तटबंदी असल्याने तटबंदीला लागून नदीचे पाणी थेट गावातील आदिवासी समाजाच्या वस्तीत घुसले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी येथील 100 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. दरम्यान, शुक्रवारी यावल आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठी असलेल्या निंबोल, ऐनपूर या गावांचा देखील तालुक्यातील इतर गावांशी संपर्क तुटला आहे. हतनूर धरणाचे बॅक वॉटर वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस सुरूच होता. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची साठी पार केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम आहे. परंतु, आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्याने पिकांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिके कुजण्याची भीती आहे.Body:जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी 9 ऑगस्ट 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 39.1 टक्के म्हणजेच 257.1 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. यावर्षी मात्र, 9 ऑगस्टपर्यंत 418.5 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 73.6 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 48.4 टक्के पाऊस हा चाळीसगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी एकाच दिवसात 48.1 मिलीमीटर सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी)

जळगाव– 426.9 मि.मी. (62.1 टक्के), जामनेर- 531.1 मि.मी. (73.6), एरंडोल- 412.5 मि.मी. (66.2), धरणगाव– 395.4 मि.मी. (63.5), भुसावळ– 467.2 मि.मी. (69.8), यावल– 496.6 मि.मी. (71.2), रावेर– 440.2 मि.मी. (65.9), मुक्ताईनगर– 476.1 मि.मी. (76.0), बोदवड– 425.9 मि.मी. (63.6), पाचोरा– 430.1 मि.मी. (57.9), चाळीसगाव– 319.8 मि.मी. (48.4), भडगाव– 346.6 मि.मी. (51.7), अमळनेर– 348.2 मि.मी. (59.8), पारोळा– 355.6 मि.मी. (57.7), चोपडा– 405.2 मि.मी. (58.6) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 63.01 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्ण उघडले-

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने शुक्रवारी दुपारी हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्णपणे उघडण्यात आले होते. धरणातून २ लाख ४२ हजार ५०७ क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे तापीकाठावरील गावातील नागरिकांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणसाठ्यात वाढ-

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यात देखील लक्षणीय वाढ होत आहे. हतनूर धरणात ३२.३९ टक्के तर गिरणा धरणात ५८.५९ टक्के पाणीसाठा आहे. तर जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात देखील ३४.४९ टक्के पाणीसाठा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे केटीवेअर, नाले तुडुंब भरले आहेत.

पावसाची रिपरिप सुरुच, सूर्यदर्शन नाहीच-

जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे संपू्र्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेवर पावसाचा परिणाम झाला आहे. जळगाव शहरात आज पहाटेपासूनच पाऊस सुरुच होता. कधी हलक्या तर कधी दमदार सरी कोसळत होत्या. दुपारनंतर भीज पाऊस सुरु होता. गेल्या चार दिवसात जळगावात सूर्यदर्शन झालेले नाही.Conclusion:मुडी गावातील 100 कुटुंबांचे स्थलांतर-

धुळे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने पांझरा नदीला पूर आला आहे. पावसाचा जोर ओसरत नसल्याने पांझरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अक्कलपाडा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पांझरा नदीचे पाणी अमळनेर तालुक्यातील मुडी गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला एका बाजूने तटबंदी असल्याने तटबंदीला लागून नदीचे पाणी थेट गावातील आदिवासी समाजाच्या वस्तीत घुसले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी येथील 100 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. दरम्यान, शुक्रवारी यावल आणि रावेर तालुक्यातील तापी नदीकाठी असलेल्या निंबोल, ऐनपूर या गावांचा देखील तालुक्यातील इतर गावांशी संपर्क तुटला आहे. हतनूर धरणाचे बॅक वॉटर वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाईट : सुभाष महाजन, शेतकरी, रावेर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.