जळगावात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तीन मजली इमारत; पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 21, 2021, 11:12 AM IST

building collapsed

सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास बाहेरपुरा भागात एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बांधकाम करताना काही तांत्रिक दोष राहिल्याने ही इमारत कोसळली. 5 वर्षांपूर्वीच इमारतीचे बांधकाम झाले होते.

इमारत कोसळली

भाडेकरूंनी खाली केली होती इमारत -

पाचोरा शहरातील व्हीपी रस्त्यावर साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची हो इमारत होती. साजेदाबी या मुंबईत राहतात. त्यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून ही तीन मजली इमारत बांधली होती. इमारतीला पावसामुळे तडे पडले होते. त्यामुळे इमारत एका दिशेने झुकून कधीही कोसळेल, अशा स्थितीत होती. खबरदारी म्हणून इमारतीतील भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती.

इमारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -

पाचोरा शहर व परिसरात सोमवारी सायंकाळपासूम रिमझिम पाऊस पडत होता. पावसामुळे रात्री 10 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. इमारत धोकादायक असल्याने यापूर्वीच नगरपरिषदेने हा रस्ता बंद केला होता. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने हानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

हेही वाचा - महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू हा हिंदूत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.