ETV Bharat / state

विवाहितेचे विवाहाच्या पाच महिन्यानंतर प्रियकरसोबत पलायन; पतीची पोलीस ठाण्यात धाव

author img

By

Published : Nov 25, 2020, 8:27 PM IST

सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील एका विवहितेने घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर प्रियकरसोबत धूम ठोकली आहे. लग्नापूर्वी विवाहितेचे एका तरुणासोबत प्रेम होते. मात्र घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नाच्या पाच महिन्यानंतर विवाहितेने प्रियकरासोबत धूम ठोकली

woman Run with boyfriend
विवाहितेचे विवाहाच्या पाच महिन्यानंतर प्रियकरसोबत पलायन

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील एका विवहितेने घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर प्रियकरसोबत धूम ठोकली आहे. सकाळी उठल्यानंतर पत्नी कुठे दिसत नसल्याचे पाहून पतीने बराच तिचा शोध घेतला. मात्र पत्नी कुठेही दिसली नाही. शेवटी पतीने पोलीस ठाणे गाठून पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


बटवाडी येथील बालाजी लोभाजी झाडे असे या पतीचे नाव असून, बालाजी यांचे हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथील तरुणीसोबत पाच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. मात्र तरुणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. ही बाब मुलीच्या नातेवाईकांना लक्षात आल्यानंतर पाच महिन्यापूर्वी तिचे लग्न बटवाडी येथील बालाजी झाडे या युवकासोबत लावून दिले होते. मात्र या दोघांचे एकमेकांवरील प्रेम अजिबात कमी झालेले नव्हते. अखेर विवाहितेने नेहमीप्रमाणे सायंकाळची कामे आटोपून जेवण केले अन् खोलीत झोपायला गेली. तर सकाळी पत्नी कुठेही न दिसल्याने त्यांनी सर्वत्र चौकशी केली. अखेर पतीने माहेरी धाव घेतली मात्र तिथेही पत्नी आढळून न आल्याने झाडे कुटुंब गोंधळून गेले.

प्रियकरासोबत विवाहिता असल्याची माहिती -

विवाहितेच्या सासर व माहेरकडील नातेवाईकांनी विवाहितेचा शोध घेतला. त्यावेळी विवाहिता प्रियकरसोबत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वजण चक्रावून गेले आहेत. आपली इज्जत झाकून ठेवण्यासाठी ही बाब कुणालाही न कळू देण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत.

पतीने गाठले थेट पोलीस ठाणे -

घरात व नातेवाइकांकडे पत्नी दिसत नसल्याचे पाहून पती व सासरची मंडळी गोंधळून गेली. शेवटी पतीने गोरेगाव पोलिस ठाणे गाठून, पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सध्या गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोहेकॉ ज्ञानेश्वर शिंदे हे तपास करीत आहेत. मात्र या दोन महिन्यात प्रेम प्रकरणाच्या घटना सर्वाधिक जास्त घडत आहेत. तर सेनगाव तालुक्यातील आकडेवारी जरा जास्तच असल्याने पालकांनी विचार करण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.