ETV Bharat / state

हिंगोलीत किरकोळ कारणावरून तुफान दगडफेक; तलवारीचा ही करण्यात आला वापर

author img

By

Published : Dec 31, 2020, 1:06 AM IST

In Hingoli, there was an argument between two groups
हिंगोलीत किरकोळ कारणावरून तुफान दगडफेक; तलवारीचा ही करण्यात आला वापर

हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात किरकोळ कारणावरून दगडफेक झाली. यामध्ये तलवारीचा वापर करण्यात आल्याचे ही समोर आले आहे. या प्रकरणामुळे रिसाला बाजार परिसराला छावणीचे रूपांतर आले आहे.

हिंगोली- शहरातील रिसाला बाजार भागात किरकोळ कारणावरून दगडफेक करण्यात आली. यामध्ये तलवारीचा देखील वापर झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दगडफेक प्रकरणात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे हे पोलीस पथक व दंगा नियंत्रण पथकासह दाखल झाले. त्यामुळे सध्या तरी रिसाला बाजार परिसराला छावणीचे रूपांतर आले आहे.

रिसाला बाजार भागात असलेल्या सोनार गल्लीत काही तरुन बसले होते. या भागात अचानक दगड फेक करण्यास सुरुवात केली. तलवारीचा देखील वापर करण्यात आला. यामध्ये जवळपास पाच ते सहा जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आल्याने, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, वेळेत पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, कर्मचारी व दंगा नियंत्रण पथक दाखल झाल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली. रात्री उशिरापर्यंत या भागात पथक तैनात होते, त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. जखमीना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

हाणामारी करणाऱ्यांचा घेतला जातोय शोध -

नेमकी कोणी हाणामारी केली अन कशासाठी याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय, परिसरात गस्त घातली जात असून, विचारपूस देखील केली जात आहे. त्यामुळे या भागात दहशद तर पसरलीच आहे. वरून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची कोणतीही नोंद झालेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.