ETV Bharat / state

यंदाही बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, हिंगोली जिल्ह्याचा निकाल 88. 54 टक्के

author img

By

Published : Jul 16, 2020, 7:14 PM IST

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला. यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल हा 88. 54 टक्के लागलेला आहे. जिल्ह्यात पाचही तालुक्यात यंदाही मुलींनी बाजी मारलेली आहे.

Hingoli district 12th result 88.54 percent
यंदाही बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, हिंगोली जिल्ह्याचा निकाल 88. 54 टक्के

हिंगोली - गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार) जाहीर झाला. यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा निकाल हा 88. 54 टक्के लागलेला आहे. जिल्ह्यात पाचही तालुक्यात यंदाही मुलींनी बाजी मारलेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 96. 50 टक्के निकाल हा वाणिज्य शाखेचा लागलेला आहे. एकंदरीतच प्रत्येक वर्षी बारावीच्या निकालात मुलीच बाजी मारतात. तो पायंडा या वर्षीही मुलींनी कायम ठेवला आहे.

हिंगोली जिल्ह्यात एकूण 12 हजार 279 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 10 हजार 872 विद्यार्थी हे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर यात 787 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. पाच हजार 119 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये आलेले आहेत. तर 4 हजार 810 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्याचा 89 टक्के तर वसमत 89. 40, सेनगाव 90 टक्के, कळमनुरी 89. 48 तर हिंगोली तालुक्याचा 85. 03 टक्के लागला आहे. तर विज्ञान शाखेचा निकाल हा 85. 39 आणि कला शाखेचा 83. 28 वाणिज्य शाखेचा मात्र निकाल 96. 12 टक्के लागला आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा निकाल हा 83. 23 लागला आहे.

या निकालांमध्ये देखील मुलींनीच बाजी मारलेली आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे 85. 66 टक्के आहे. तर मुलीचे प्रमाण हे 92.13 टक्के एवढे आहे. त्यामुळे मुलींनी निकालाच्या बाबतीत गड कायम राखलेला आहे. काही दिवसापूर्वी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याच आठवड्यात बारावीचे निकाल लागतील असे सांगितले होते. तेव्हापासून बारावीच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.