Brother And Sister Drown : दुर्दैवी, पूर्णा नदी पात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला

author img

By

Published : May 13, 2022, 3:29 PM IST

Drown

शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पूर्णा नदी पात्रात बुडून ( Brother And Sister Drown Purna River ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील बोडखा ( Brother And Sister Drown Bodkha Sengaon Hingoli ) येथे समोर आली आहे.

हिंगोली - शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पूर्णा नदी पात्रात बुडून ( Brother And Sister Drown Purna River ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सेनगाव तालुक्यातील बोडखा ( Brother And Sister Drown Bodkha Sengaon Hingoli ) येथे समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. बहिणीचा पाय घसरून ती नदीत पडली असता तिला बाहेर काढण्यासाठी भावाने ही उडी घेतली होती. मात्र, पोहता येत नसल्याने, दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.

विशाखा गुलाब राठोड (७), गोपाल गुलाब राठोड(१०), अशी मयत बहीण भावांची नावे आहेत. गुलाब राठोड यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेळ्या आहेत. वडिलांना काम आल्याने, त्यांनी गोपाल आणि विशाखाला शेळ्या राखण्यासाठी सांगितले. शेळ्या चारता चारता पूर्णा पात्रावर पाणी पिण्यासाठी गेल्या असता, विशाखाचा नदी पात्रात पाय घसरला आणि ती नदी पात्रात पडली. सोबतच असलेला भाऊ गोपालने बहीण नदीत पडल्याचे पाहताच लागलीच नदी पत्रात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने, दोघांचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बराच वेळ वापस न आल्याने त्यांची पाहणी केली तर दोघेही पाण्यात बुडून मृत झाल्याचे दिसून आले.

पोलीस स्टेशनला नाही अजूनही नोंद - घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकच धाव घेतली. दोघांचे ही मृतदेह बाहेर काढले. मात्र, या प्रकरणी अजून तरी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नसल्याची माहिती ओंढा नागनाथ पोलिसांनी दिली. एवढी मोठी भयंकर घटना घडलेली असताना देखील पोलिसांना याबाबत जराही कल्पना नसल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा - Aurangzeb : दिल्लीचा शहेनशहा औरंगजेबाची का आहे खुलताबादेत कबर, जाणून घ्या सविस्तर माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.