ETV Bharat / state

कंटेनर-दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू , एक गंभीर

author img

By

Published : Jan 23, 2020, 5:24 PM IST

bike-and-container-accident-in-hingoli
bike-and-container-accident-in-hingoli

जिल्ह्यात चोहोबाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज औंढा ते जिंतूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक झाली.

हिंगोली- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा औंढा-जिंतूर रोडवर झालेल्या कंटेनर दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरूवारी) तीनच्या सुमारास घडली.

कंटेनर-दुचाकीचा अपघात

हेही वाचा- लोकशाही निर्देशांकाच्या क्रमवारीनुसार भारतात 'सदोष लोकशाही'

जिल्ह्यात चोहोबाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज औंढा ते जिंतूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील तीन पैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. ही धडक एवढी जोराची होती की, यामध्ये कंटेनर हा पूर्णता रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. तर दुचाकीही रस्त्याच्या कडेला घासत गेली. यालीत दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर एक गंभीर जखमी अवस्थेत होता. प्रवाशांनी घटनास्थळी वाहने थांबवून जखमीला मदत करण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेला संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वैजनाथ मुंढे यांनी पथकासह धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून, दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील व्यक्तींची नावे अद्याप कळू शकले नाहीत.

Intro:



हिंगोली- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा औंढा ते जिंतूर रोडवर झालेल्या कंटेनर दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सायंकाळी तीनच्या सुमारास घडली.


Body:
हिंगोली जिल्ह्यात चोहोबाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे आज औंढा ते जिंतूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी कंटेनरची समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकीवरून तीन जण प्रवास करणाऱ्या पैकी दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही धडक एवढी जोराची होती की यामध्ये कंटेनर हा पूर्णता रस्त्याच्या कडेला जाऊन पडला तर दुचाकी ही रस्त्याच्या कडेला घासत गेली. दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तर एक गंभीर जखमी असलेला पडलेला. मदतीसाठी विनवणी करीत होता. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांनी घटनास्थळी वाहने थांबवून जखमीला मदत करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी रुग्णवाहिकेला संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोनि वैजनाथ मुंढे यांनी पथकासह धाव घेतली. Conclusion:घटनेचा पंचनामा करून, दोघांचे ही मृत्यूदेह शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. अजून तरी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र अपघाताच्या मालिका सुरूच आल्याचे पुन्हा एकदा या घटनेने समोर आलेय. मयत व जखमीची नावे अजून कळू शकले नाहीत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.