ETV Bharat / state

गोंदिया शहरातील भिंती झाल्या बोलक्या, नगर परिषदेचा अभिनव उपक्रम

author img

By

Published : Dec 24, 2020, 5:28 PM IST

Updated : Dec 24, 2020, 6:59 PM IST

स्वच्छ सर्वेक्षण
स्वच्छ सर्वेक्षण

गोंदिया शहरातील शासकीय इमारतींच्या भिंतीबाहेर अतिक्रमण वाढले होते. हे अतिक्रमण हटवून त्या भिंतींवर विविध संदेश रेखाटण्यात आले आहेत. यामुळे त्या भिंती आकर्षक दिसत आहेत.

गोंदिया - शहराच्या विविध भागातील शासकीय इमारतींच्या भिंती अत्यंत खराब झालेल्या असतात. पण, गोंदिया नगरपरिषदेने शासकीय इमारतींच्या भिंतींवर विविध संदेशाचे चित्र काढून त्या भिंतींना वेगळे रुप दिले आहे. यामुळे भिंती आकर्षक दिसत असून विविध सामाजिक संदेशही यातून नागरिकांपर्यंत जात आहे.

बोलताना मुख्याधिकारी

गोंदिया शहरातील शासकीय इमारतीच्या समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. ते अतिक्रम काढून त्या ठिकाणी स्वच्छतेचा व पर्यावरणाचा संदेश घरा-घरापर्यंत जावा या हेतूने पालिकेने शासकीय भिंतींवर चित्रकारांकडून चित्र काढून घेतले आहे.

गोंदिया नगरपालिका रेंगाळलेल्या कामांमुळे चर्चेत होती. मात्र, करण चव्हाण यांनी मुख्याधिकारी पदाचा कारभार सांभाळल्यानंतर विविध कामांना गती मिळाली. शहरातील अतिक्रमण काढण्यात आले. थकीत कराची वसुली करण्यासाठी दुकाने सील करण्याचे अभियान राबविण्यात येत आहेत. पालिका दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच ऍक्शन मोडमध्ये आली आहे.

अतिक्रमण निघाल्याने रस्ते झाले रुंद

शहरातील विविध ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले होते. पालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहिम राबविण्यात आली. यामुळे रस्ते रुंद झाले आहेत.

हेही वाचा - गोंदियात दुचाकी बसला धडकली; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

हेही वाचा - गोंदिया नगरपरिषदेने ठोकले सार्वजनिक बांधकाम विभागाला कुलूप, आतापर्यंत ७३ लाखाची कर वसुली

Last Updated :Dec 24, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.