ETV Bharat / state

'ती' हत्या ऑनरकिलींगच! मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्यानं बापानेच केली प्रियकराची हत्या

author img

By

Published : Mar 5, 2020, 7:50 AM IST

Updated : Mar 5, 2020, 3:11 PM IST

मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्यानं बापानेच प्रियकराची हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Murder of a young man for Love affair in Gondia
मृत अतुल तरोणे

गोंदिया - प्रेमसंबधातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना जिल्ह्यातील मोरवाही गावात घडली. ही हत्या प्रेयसीच्या वडिलांनी केली असून, पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत गजाआड केले. अतुल तरोणे (१७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ही हत्या आपसातील वैमन्यासातून केली असावी, असा प्राथमिक अंदाज सुरुवातीला लावण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे फिरवत ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी गावातील तरुणीच्या वडिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. माझ्या मुलीचे या तरुणांशी प्रेमसंबंध असून, आपल्याला हे मान्य नसल्याने हत्येचा कट रचल्याची कबुली आरोपीने दिली.

प्रदीप अतुलकर, पोलीस निरीक्षक गोंदिया ग्रामीण

गोंदिया जिल्ह्याच्या मोरवाही गावातील १७ वर्षीय अतुल तरोने हा ११ वी च्या वर्गात शिकत होता. मात्र, त्याचे १० व्या वर्गाचे २ विषय राहिले असल्याने काल (बुधवार) तो मराठी विषयाचा पेपर देऊन घरी परत जात होता. त्यावेळेस प्रेयसीच्या वडिलाने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या करुन पळ काढला. त्यानंतर अतुलला रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी सेवकराम मानिराम गुरुबेले (45 वर्ष रा. मोरवाही) याला अटक करण्यासाठी ३ पथके तयार केली होती.

अतुलचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबध होते, हे प्रेयसीच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यातूनच त्यांनी ही हत्या केली असल्याचा संशय येताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यावेळी प्रेमसंबध पसंद नसल्याने ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली असून, आरोपी विरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated :Mar 5, 2020, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.