ETV Bharat / state

माझ्या परिवाराची संपत्ती कुठे कुठे ते शोधा; कुणाच्या बापाला घाबरत नाही - मंत्री नवाब मलिकांचे आवाहन

author img

By

Published : Oct 30, 2021, 3:07 PM IST

Updated : Oct 30, 2021, 3:27 PM IST

minister nawab malik
मंत्री नवाब मलिक

तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. यावरुन नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते. आर्यनला जामीन आधीच मंजूर व्हायला होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

गोंदिया - मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा आरोप केला होता. त्यावर नवाब मल्लिक यांनी मोहित कंबोजवर पलटवार करत ज्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे त्यांनी माझ्यावर आरोप करणे योग्य नाही. माझ्याकडे सगळे कागदापत्रे आहेत. मी भंगारवाला आहे. माझ्याकडे १०० टन रद्दी पडलेली आहे. बँक बुडवून मी कोट्यावधी खाल्ले नाही, असे प्रत्युत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिले. तसेच मलिक परिवाराची संपत्ती कुठे कुठे आहे ते शोधा, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. ते गोंदिया येथे बोलत होते.

माध्यमांसोबत बोलताना मंत्री नवाब मलिक

ते म्हणाले, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते व हॉटेलचे कोण मालक आहेत? हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. आम्ही आता नाव घ्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा - मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता

आर्यनला आधीच जामीन मंजूर व्हायला हवा होता...

तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाला. यावरुन नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते. आर्यनला जामीन आधीच मंजूर व्हायला होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एनसीबीने कारवाईचे जे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थळावरील नसून एनसीबी ऑफिसमधील आहेत. समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते. एनसीबीने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसविल्या जात होते. तर समीर वानखेडे यांच्यासोबत कासिफ खान हासुद्धा सहभागी होता. त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खान याच्याविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असे वक्तव्य नवाब मल्लिक यांनी गोंदियात केले.

Last Updated :Oct 30, 2021, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.