ETV Bharat / state

आदिवासी अनाथ मुलींचे नाथ बनले जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे २० अधिकारी

author img

By

Published : Jun 25, 2021, 1:39 PM IST

अनाथ मुलींचे नाथ बनले जिल्हाधिकारी राजेश खवले
अनाथ मुलींचे नाथ बनले जिल्हाधिकारी राजेश खवले

आई-वडील मृत्यू पावल्याने अनाथ झालेल्या वैष्णवी व आरती या दोन मुलींच्या घरी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

गोंदिया -आई-वडील मृत्यू पावल्याने अनाथ झालेल्या वैष्णवी व आरती या दोन मुलींच्या घरी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मुलींच्या भविष्य कालीन व्यवस्थेचे नियोजन 20 अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत कुटूंबाला बालकांचे संगोपनाकरिता लाभ मिळवून देण्यात येत आहे. तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

खाडीपार ग्राम येथील सुरज मरस्कोल्हे यांना चार वर्षांची वैष्णवी व अडीच वर्षांची आरती नावाच्या दोन मुली आहेत. परंतु सुरज यांचा एक वर्षापुर्वी आजाराने मृत्यु झाला. त्यानंतर त्यांची पत्नी सीमा यांचाही मृत्यु काही दिवसांअगोदरच झाला. दोन्ही मुलींच्या आई-वडिलांचे मृत्यु झाल्याने दोन्ही बहिणी अनाथ झाल्या आहेत. त्यांची आजी ८० वर्षांची आहे. तीची आर्थिक स्थिती खुप बिकट आहे. या दोन मुलींचे पालपोषण त्यांची आजीच करते. परंतु ८० वर्ष असलेल्या आजीला स्वत:चे पोट भरणे शक्य नाही, अशात दोन लहान मुलींचे पालन-पोषण कसे करणार? हा प्रश्न आजीसमोर आहे. 'वैष्णवी व आरती जेव्हा सकाळी झोपेतुन उठतात तेव्हा सगळ्यात अगोदर आईचे नाव घेतात. तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे करण्यासाठी खेळणे व चॉकलेट देउन समजवते. त्यांना माहीतीच नाही की आई-वडिलांचा मृत्यु झाला आहे', असे मुलींची आजी सांगत होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मुलींच्या कुटूंबीयांची भेट

या सगळ्या प्रकारची माहिती गोंदिया जिल्हाचे जिल्हा अधिकारी राजेश खवले यांना मिळताच त्यांनी तात्काळ या आदिवासी कुटूंबियांना भेट दिली व ही बाब गंभीरीयाने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर या कुटूंबाला मदत करण्याचे आवाहन केले. आणि तातडीने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी या कार्याला उत्स्फुर्त प्रतिसाद देवून 20 अधिकारी यांनी दरमहा 500 रुपये योगदान देऊन दहा हजार रुपयांची मदत देण्याकरीता इच्छुक असल्याचे म्हटले.

चांगल्या कामासाठी माणूस धनातून नाही तर मनातून श्रीमंत असणे आवश्यक

जिल्हाधिकारी राजेश खवले यावेळी कुटूंबियांना म्हणाले की, 'ही मदत केवळ एक महिन्यापूरती किंवा एकाच वेळेपुरती मर्यादित नसून, जोपर्यंत हे कुटूंब स्थिर होत नाही तोपर्यंत या कुटूंबाला मदत केली जाणार आहे'. दोन अनाथ मुलींना सांभाळणाऱ्या आजीचे वय 80 वर्ष आहे. हे विचारात घेऊन मुलींच्या भविष्य कालीन व्यवस्थेचे देखील नियोजन या 20 अधिकाऱ्यांनी केलेले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत कुटूंबाला बालकांचे संगोपनाकरिता लाभ मिळवून देण्यात येत आहे. तसेच तहसिलदार यांनी सदरहू कुटूंबाला स्वस्त धान्य आणि सामाजिक सहायता योजनेचा लाभ देखील मिळूवन देण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. 'चांगल्या कामासाठी माणूस धनातून श्रीमंत असणे आवश्यक नाही, तर मनातून श्रीमंत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कुटूंबाला अधिकाधिक लोकांनी मदत करावी व त्यांचे दु:ख नाहीसे करावे', असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.

मदत करणारे अधिकारी

गोंदिया जिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती नंदिनी आवळे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल कचवे, जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, तहसिलदार उषा चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रविण तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढीवे, राहुल तिवारी, मुंबईच्या माधवी सरदेशमुख अशी मदत देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहे.

हेही वाचा - भटिंडाची रिक्षाचालक 'छिंदर पाल कौर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.