ETV Bharat / state

वीर जवान कापगते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

author img

By

Published : May 27, 2021, 8:19 PM IST

Updated : May 27, 2021, 9:38 PM IST

गोंदिया
गोंदिया

नागालँडमध्ये दहशतवादी व सीआरपीएफ जवानांमध्ये 25 मे रोजी झालेल्या चकमकीत गोळी लागल्याने सडक अर्जुनी तालुक्याच्या परसोडी गावातील प्रमोद कापगते यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. 27 मे) मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोंदिया - नागालँडमध्ये दहशतवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी या गावातील प्रमोद कापगते या जवानास गोळी लागल्याने वीरमरण आले. या जवानाच्या पार्थिवावर गुरूवारी (दि. 27 मे) शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर प्रमोद कापगते यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, वडील आणि भाऊ, असा परिवार आहे. ते भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक कापगते यांचे ते सुपत्र होते.

वीर जवान कापगते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नागालँड बार्डरवर 25 मे रोजी सकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमक झाली. यात गोळी लागून सीआरपीएफचे जवान प्रमोद कापगते यांना वीरमरण आले. त्यांचा मृतदेह गुरुवारी (27 मे) त्यांच्या मुळगावी परसोडी येथे आणण्यात आले. त्यांच्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमोद कापगते हे 2001 मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते. त्यांनी नुकतेच आपल्या सेवेचा पहिला टप्पा गाठत देश सेवेची 20 वर्षे 10 एप्रिलला पूर्ण केली. प्रमोद हे स्वेच्छा निवृत्ती घेऊन या महिन्यातच मूळगावी परत येणार होते, अशी माहिती त्यांनी आपल्या कुटुंबियांना फोनद्वारे दिली होती. कागदपत्रेही त्यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे दिली होती. मात्र, 25 मे रोजी सकाळी प्रमोद यांचा चकमकीत गोळी लागल्याने मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या कुटुबियांना मिळाली.

20 वर्षांपासून सेवेत

प्रमोद कापगते बीए अंतीम वर्षाला असताना सन 2001 साली सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण परसोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सडक अर्जुनी येथील राजीव गांधी महाविद्यालयात पूर्ण झाले. मागील 20 वर्षांपासून ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते.

15 दिवसांनी होणार होती सेवा पूर्ण

सीआरपीएफमधील त्यांची 20 वर्षांची सेवाही 15 दिवसांनी पूर्ण होणार होती. मात्र, मंगळवारी (दि. 25 मे) नागालॅंड बार्डरवर झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.

हेही वाचा - धान खरेदीवरून ठाकरे सरकार तोंडघशी, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Last Updated :May 27, 2021, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.