ETV Bharat / state

अखेर 'त्या' शिकार झालेल्या बिबट्याचे मिळाले डोके

author img

By

Published : Jan 20, 2021, 3:38 PM IST

बिबट्या
बिबट्या

गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेतात शॉकदेत दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी चौघांना 20 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील तिल्ली-मोहगाव येथील शेतात शॉक देत दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली होती. यातील एका बिबट्याचे मुंडके कापून आरोपींनी गौरीटोला ते चांगोटोला दरम्यान असलेल्या पांगोली नदीच्या पाण्यात गाडुन ठेवले होते. आरोपी हेतराम मधु गावळ याने वनाधिकाऱ्यांना ती जागा दाखविली असता बिबट्याचे मुंडके, दात व मिशीसह जप्त करण्यात आले आहे.

ग्राम तिल्ली येथील देवानंद सोनवाने यांच्या शेतातील विहिरीत 3 जानेवारीला एक बिबट्या मृतावस्थेत आढळला होता. बिबट्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत असता 4 जानेवरीला घटनास्थळाजवळ असलेल्या झुडपात दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तर जवळच नीलगायचे अवशेषही मिळून आले होते. या प्रकरणात हेतराम मधू गावळ (रा. इंदिरानगर तिल्ली), देवराम श्यामलाल नागपुरे, लिंगम रमेश येरोला, हेतराम गणपत मेश्राम (सर्व रा. चोपा बाजारटोला) या चौघांना अटक करण्यात आली. या चार आरोपींना न्यालयात हजर केले असता आरोपींना वन कोठडी मिळाली आहे. वनाधिकाऱ्यांनी आरोपींकडे विचारपूस केली असता आरोपी लिंगम याने गावातीलच मन्साराम यांच्या घरी लपवून ठेवलेली 4 नखे जप्त करण्यात आली आहेत. तसेच एका बिबट्याचे डोके कापून पांगोली नदीत गाडून ठेवले असल्याचे ही कब्लू दिली व ते डोके देखील वन विभागाने हस्त गत केले आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली होती.

हेही वाचा - धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; अन्यथा, रस्त्यावर उतरू - भाजप महिला मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.