ठाकरे सरकारला शेतकऱ्यांची कमी, बेवड्यांची जास्त काळजी - फडणवीस

author img

By

Published : Apr 4, 2022, 4:03 PM IST

Updated : Apr 4, 2022, 6:19 PM IST

Devendra Fadanvis

आमच्या पाठित खंजिर खुपसुन आलेले हे सरकार आता तुमच्या पाठित खंजिर खुपसत आहे. ठाकरे सरकारला (Thackeray government cares) शेतकऱ्यांची कमी बेवड्यांची जास्त काळजी ( less about farmers and more about Drinker) आहे असे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी महाआघाडी सरकारवर मोठी टिका केली आहे.

गडचिरोली: गडचिरोलीत आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाजनआक्रोश सभा झाली. यावेळी माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलेकी, सध्या आघाडी सरकारकडून भ्रष्टाचाराची टी-20 सुरु आहे. जिथे जाऊ तिथे लुटून खाऊ अशी या आघाडी सरकारची योजना आहे. मुंबईत बिल्डरांकडे थकलेला 2300 कोटीचा कर वसूल करण्याची हिम्मत सरकार करत नाही मात्र वीज बिल, कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. धान उत्पादकांना 100 ते 150 कोटीचा बोनस देण्यासाठी सरकारमध्ये संवेदना नाही

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस

आमचे सरकार राहीले असते पण त्यांनी आमच्या पाठित खंजिर खुपसला हे एक वेळ ठिक आहे पण हे सरकार आता तुमच्या पाठित खंजिर खुपसत आहे. या सरकारने वीज कंपन्या डुबवल्या, त्यामुळे लोडशेडिंग आणि वीज कनेक्शन कापणे सुरू आहे.ओबीसी आरक्षण वाचवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले पण या सरकारने ओबिसीचे राजकीय आरक्षण गमावले इम्पीरीकल डेटा मागतोय असे सांगत टाईमपास केला केंद्राचा डेटा नकोच होता हे न्यायालयात नंतर सिध्द झाले.

ठाकरे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव होऊ नये म्हणुन केंद्र सरकारने पाठवलेले धान्य गोदामात सडवले पण ते गरीबाला दिले नाही. शेतकऱ्यांची वीज कापण्याचा नालायकपणा सरकारने केला आहे. आमचे सरकार आले की, आम्ही शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ. करोना काळात यशवंत जाधवांनी 400 कोटीची संपत्ती गोळा केली. त्यांना म्हणे या भ्रष्टाचारातील फक्त 10 टक्केच मिळाले मग उरलेले 90 टक्के कुठे गेले. असा सवाल फडणवीस यांनी यावेळी विचारला. गरीबांच्या तोंडचा घास खानारे सरकार तुम्हाला काय मदत करणार, हे सरकार वटणीवर आल्या शिवाय राहणार नाही त्यासाठी आम्ही गडचिरोलीतुन एल्गार सुरु केला आहे. असेही त्यांनी सांगितले.

Last Updated :Apr 4, 2022, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.