ETV Bharat / state

गडचिरोली: टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्या, अन्यथा आत्मदहन करू; टॅक्सी चालकांचा इशारा

author img

By

Published : Aug 25, 2020, 5:43 PM IST

येत्या ७ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा टॅक्सीचालक संघटनेने दिला आहे. राज्य शासनाने एसटी वाहतुकीला परवानगी दिली असून त्याच धर्तीवर काळी पिवळी टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅक्सी चालक
टॅक्सी चालक

गडचिरोली- कोरोना महामारीमुळे सध्या खासगी वाहतुकीवर प्रतिबंध आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने अनेक खाजगी वाहन चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे, नियमांमध्ये शिथिलता देऊन ५ अधिक १ प्रवासी काळी-पिवळी टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा जय महाराष्ट्र काळी-पिवळी टॅक्सी चालक संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

प्रतिक्रिया देताना टॅक्सी चालक लीलाधर उईके

वाहतुकीवर बंदी असल्याने अनेक टॅक्सी चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोनवर खरेदी केलेल्या काळी-पिवळी टॅक्सीचे हप्ते भरणे कठीण जात असून फायनान्स कंपन्या हप्ते वसुलीसाठी तगादा लावत आहेत. मात्र, वाहतूक बंद असल्याने हप्ते भरण्यास अडचण जात असून या बाबीचा विचार करून जिल्हांतर्गत काळी-पिवळी टॅक्सी वाहतुकीला पाच अधिक एक प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जय महाराष्ट्र काळी-पिवळी टॅक्सी चालक मालक संघटनेने केली आहे.

येत्या ७ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा टॅक्सीचालक संघटनेने दिला आहे. राज्य शासनाने एसटी वाहतुकीला परवानगी दिली असून त्याच धर्तीवर काळी पिवळी टॅक्सी वाहतुकीला परवानगी द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा- तब्बल पाच दिवसानंतर भामरागडचा पूर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.