ETV Bharat / state

पोलिसांच्या उपक्रमामुळे, आयुष्मान भारत योजनेसाठी वंचितांना बळ

author img

By

Published : Mar 16, 2021, 6:54 PM IST

photo
छायाचित्र

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभसाठी नोंदणी करता यावी त्यांना कागदपत्रे काढणे सुलभ व्हावे यासाठी गडचिरोली पोलिसांनी 'पोलीस दादालोरा खिडकी' सुरू करण्यात आली आहे.

गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभसाठी नोंदणी करता यावी त्यांना कागदपत्रे काढणे सुलभ व्हावे यासाठी गडचिरोली पोलिसांनी 'पोलीस दादालोरा खिडकी' सुरू करण्यात आली. या उपक्रमामुळे तळगाळातील नागरिकांना या माध्यमातून आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी करण्यात येत आहे. रस्ते, वीज नसलेल्या गावातील लाभार्थ्यांना लाहेरीमध्ये बोलवून त्यांची नोंदणी करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 मधील शिफारशीनुसार शाश्वत विकास ध्येयामध्ये नमूद आरोग्य सेवा नागरिकांना वैश्विक आरोग्य कवच पुरविण्याचे उद्दिष्टाने केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून आयुष्मान भारत या योजनेस ओळखले जाते. या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा प्रारंभ 23 सप्टेंबर, 2018 रोजी विद्यमान पंतप्रधानांचे हस्ते झाला. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी शासकीय आरोग्य हमी योजना असून प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाख रुपये पर्यंतचा द्वितीय आणि तृतीय स्तरावरील उपचार याअंतर्गत मोफत होईल.

शासनाने जरी ही योजना मोठा गाजावाजा करत सुरू केली असली तरीही अद्याप ही योजना तळागाळातील पात्र व वंचित घटकापर्यंत पोहोचली नाही. त्यात पुन्हा नक्षलग्रस्त गडचिरोलीसारखा दुर्गम भाग तर एक मोठे आव्हानच या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत आहे.

याला पर्याय शोधत गडचिरोलीचे पोलीस विभागाचे 'पोलीस दादा लोरा खिडकी' सुरt केली आहे. या उपक्रमांतर्गत उप पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर यांनी लाहेरी सारख्या ठिकाणी आयुष्मान भारत योजना लाभार्थी नोंदणी शिबीर सुरू केले. आतापर्यंत नक्षलप्रभावित क्षेत्रातील 668 लाभार्थ्यांची नोंदनीकरणयस यशश्वी ठरले.

हेही वाचा - इतिहासात पहिल्यांदाच गडचिरोलीतील 'मार्कंडादेव' यात्रा रद्द

हेही वाचा - गडचिरोली; इंटरनेटअभावी विद्यार्थ्यांना द्यावी लागली चक्क जंगलात परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.