ETV Bharat / state

मुसळधार पावसाने गडचिरोली नगर परिषदेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी ; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

author img

By

Published : Aug 13, 2019, 2:35 PM IST

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात जिल्हाभरात सरासरी 55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मुसळधार पावसाने गडचिरोली नगर परिषदेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी

गडचिरोली - सोमवार सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नगरपरिषद, पेट्रोल पंपसह अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. कन्नमवार वॉर्डांमध्ये रस्त्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती काहीशी गडचिरोली शहरात निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने गडचिरोली नगर परिषदेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात जिल्हाभरात सरासरी 55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला. धानोरा तालुक्यात 89, आरमोरी 99 तर कुरखेडा तालुक्यात 90 मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या सती नदीला पूर आला आहे. सती नदीवर कढोली जवळ असलेल्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कढोली-वैरागड मार्ग सकाळ पासून बंद झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद व खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर केल्याची माहिती शिक्षणाधिकारी मुनघाटे यांनी दिली

Intro:मुसळधार पावसाने गडचिरोली नगर परिषदेसह अनेक घरांमध्ये घुसले पाणी ; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

गडचिरोली : सोमवारच्या सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसाने नगरपरिषद, पेट्रोल पंपसह अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. तर कन्नमवार वॉर्डांमध्ये रस्त्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती काहीशी गडचिरोली शहरात निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या व खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.Body:ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात जिल्हाभरात सरासरी 55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला. तर धानोरा तालुक्यात 89, आरमोरी 99 तर कुरखेडा तालुक्यात 90 मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या सती नदीला पूर आला आहे. सती नदीवर कढोली जवळ असलेल्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कढोली-वैरागड मार्ग आज सकाळ पासून बंद झाला आहे. आताही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी एक पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद व खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर केल्याची माहिती शिक्षणाधिकारी मुनघाटे यांनी दिली आहे.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.