ETV Bharat / state

नक्षल माहिती देणाऱ्या 152 खबरींपैकी 25 जणांना मिळाली नोकरी

author img

By

Published : Apr 17, 2021, 10:34 PM IST

गडचीरोली
गडचीरोली

सद्यास्थितीत जिल्हा प्रशासनाकडे शिफारस करिता शिल्लक असलेले उमेदवारांना नियुक्ती देण्याचे दृष्टीने विविध कार्यालयाकडून रिक्त पदाची माहिती घेण्यात येत असून नक्षलपीडित उमेदवारांना तातडीने लाभ देण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत असे जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गोपनीय बातमीदारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी पात्रतेनुसार वर्ग-3 व वर्ग-4च्या पदावर शासन सेवेत थेट नियुक्ती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 152 खबरींपैकी 25 जणांना नोकरी देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक यांच्याकडून 180 प्रस्ताव -

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचेकडून जिल्हाधिकारी कार्यालयास एकूण 180 प्रस्ताव प्राप्त झालेले असून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ज्येष्ठता यादी तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांचे ज्येष्ठतेनुसार व शैक्षणिक तसेच आवश्यक पात्रतेनुसार जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध कार्यालयाकडून रिक्त असलेल्या पदांची तातडीने माहिती घेवून त्यातील रिक्त पदावर नियुक्ती करण्याकरिता सन 2018पासून ते आजतागायत पर्यंत वर्ग-3 करिता म. रा. सह. आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांचेकडे 38 उमेदवार, मुख्यवनसंरक्षक गडचिरोली यांचेकडे 8 उमेदवार, जिल्हा अधीक्षक गडचिरोली यांचेकडे 4 उमेदवार, पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचेकडे 89 उमेदवार, परिवहन महामंडळ गडचिरोली यांचेकडे 1 उमेदवार, जिल्हा हिवताप कार्यालय यांचेकडे 2 उमेदवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांचेकडे 4 उमेदवार, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांचेकडे 1 उमेदवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांचेकडे 2 उमेदवार, व महसूल विभागात 3 उमेदवार असे एकूण 152 उमेदवारांना शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी म. रा. सह. आदिवासी विकास महामंडळ. मर्या. नाशिक यांच्याकडून 8, महसूल विभाग-3, वनविभाग 8, पुरवठा विभाग 4, कृषी विभाग 1, व जिल्हा हिवताप कार्यालय 1 असे एकूण 25 उमेदवारांना संबंधित विभागाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती करण्याबाबतची संबंधित कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे.

उर्वरीत उमेदवारांना नियुक्ती देण्याचे दृष्टीने प्रयत्न-

सद्यास्थितीत जिल्हा प्रशासनाकडे शिफारस करिता शिल्लक असलेले उमेदवारांना नियुक्ती देण्याचे दृष्टीने विविध कार्यालयाकडून रिक्त पदाची माहिती घेण्यात येत असून नक्षलपीडित उमेदवारांना तातडीने लाभ देण्याकरिता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहेत असे जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.