गडचिरोली : जनमिलीशीयाच्या सदस्याला अटक; नक्षलवाद्यांसाठी लावत होता बॅनर

author img

By

Published : Sep 20, 2021, 7:38 PM IST

banner

21 सप्टेंबर हा नक्षलवाद्यांचा विलय दिन आहे. या पार्श्वभुमीवर नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत आहेत. अतिदुर्गम गावामध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलीशीया कार्यरत आहेत. अटक करण्यात आलेला लालसु चैतु मट्टामी हा जनमिलीशीया सदस्य आहे.

गडचिरोली - नक्षल बॅनर लावतांना नक्षलवाद्यांच्या जनमिलीशीया सदस्याला गडचिरोली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. सदर जनमिलीशीया हा कोठी हद्दीतील तुमरकोडी या गावातील रहिवासी आगे. त्याचे नाव लालसु चैतु मट्टामी असे आहे. ही कारवाई उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील जंगल परिसरात करण्यात आली.

21 सप्टेंबर हा नक्षलवाद्यांचा विलय दिन आहे. या पार्श्वभुमीवर नक्षलवादी जिल्ह्यातील विविध भागात हिंसक कारवाया करण्याच्या तयारीत आहेत. अतिदुर्गम गावामध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलीशीया कार्यरत आहेत. अटक करण्यात आलेला लालसु चैतु मट्टामी हा जनमिलीशीया सदस्य आहे.

नक्षलवाद्यांच्या विलय दिनाच्या निमित्ताने -

गडचिरोली पोलीस दलाकडुन त्याला नक्षलवाद्यांना मदत न करण्याबाबत वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या. तरीही तो पोलिसांचे सांगणे ऐकुन न घेता नक्षलवाद्यांना मदत करीत होता. आज (सोमवारी) कोठी जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या विलय दिनाच्या निमित्ताने सामान्य जनतेमध्ये दहशत परविण्यासाठी नक्षल बॅनर लावत असताना आढळुन आला. त्याच्याकडुन नक्षल बॅनर व इतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले असुन गडचिरोली पोलीस दलाकडुन त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.