ETV Bharat / state

कर्जमुक्ती योजना : गडचिरोली जिल्ह्यातील 12 हजार 611 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.10 कोटी रुपये जमा

author img

By

Published : Aug 7, 2020, 6:36 PM IST

कर्जमुक्तीच्या यादीत मयत खातेदारांचे नाव असल्यास मयत खातेदारांचे नातेवाईक अथवा कायदेशीर वारसदाराने आधार प्रमाणीकरण न करता आपली संपूर्ण माहिती दिनांक 10 ऑगस्ट 2020 पर्यंत संबधित बँक शाखेला पुरवावी.

कर्जमुक्ती योजना गडचिरोली
कर्जमुक्ती योजना गडचिरोली

गडचिरोली - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील 15 हजार 791 शेतकऱ्यांपैकी 15 हजार 142 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी 14 हजार 778 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले असून, त्यापैकी 12 हजार 611 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.10 कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, 364 शेतकऱ्यांनी अजूनही आधार प्रमाणीकरण पूर्ण केले नसल्याने त्यांना लाभ मिळालेला नाही. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार क्रमांक प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

दरम्यान, सदर योजनेतील पात्र लाभार्थ्यांची पाचवी यादी शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली असून, मयत खातेदाराच्या बाबतीत वारसदार चढले नसल्याने संबधित बँक व शासनस्तरावर योजनेत अडचणी येत आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँकामध्येही खाते असलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळत आहे. या योजने अंतर्गत प्रशासनाने व बँक यंत्रणेने आवाहन केल्यानुसार 14 हजार 778 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. परंतु, बँक ऑफ इंडियातील 119 शेतकरी खातेदार, बँक ऑफ महाराष्ट्र 61, कॅनरा बँक 04, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 06, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 61, आय.डी.बी.आय. बँक 05, स्टेट बँक ऑफ इंडिया 60 तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 48 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

कर्जमुक्तीच्या यादीत मृत खातेदारांचे नाव असल्यास मयत खातेदारांचे नातेवाईक अथवा कायदेशीर वारसदाराने आधार प्रमाणीकरण न करता आपली संपूर्ण माहिती 10 ऑगस्ट 2020 पर्यंत संबंधित बँक शाखेला पुरवावी.

बँकेच्या नियमाप्रमाणे वारस लावण्याची प्रक्रिया पूर्ण करून वारसाची नोंद कर्ज खात्यात करून घेण्यासह याबाबतची माहिती दिनांक 10 ते 17 ऑगस्ट 2020 दरम्यान बँक पोर्टलवर भरणार असल्याने मयत खातेदारांच्या वारसदारांनी विहीत मुदतीत दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तर या योजनेअंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेण्यासाठी संबधित गटसचिव, बँक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.